आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्मार्ट होण्याची संधी: स्टेट बँक, फेसबुक, व्हॉट‌्सअॅपसाठी नवीन फीचर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- स्टेट बँक ऑफ इंडिया, व्हाॅटसअॅप आणि फेसबुकसाठी आता नवीन फीचर्स अपडेट झाले आहेत. त्यानुसार वापरकर्त्यांना अधिक स्मार्ट होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. बँकेची कामे, वाचनाचा छंद आता स्मार्टफोनच्या मदतीने उपभोगता येईल. यासाठी गुगल प्ले स्टोअरमधून मोफत उपलब्ध होणारे अॅप डाऊनलोड करायचे आहे.
‘स्टेट बँक एनीवेअर’ नावाचे हे अॅप नव्याने आले आहे. या अॅपच्या माध्यमातून आपण अकाउंट संदर्भातील विविध सूचना, मिनी स्टेटमेंट घेणे, फंड ट्रान्सफर करणे, चेक बुक रिक्वेस्ट पाठवणे, एफडी िकंवा आरडी संदर्भातील माहिती घेऊ शकणार आहेत. तसेच या अॅपच्या मदतीने बिल पेमंेट, रिचार्ज करता येणे शक्य आहे. बँकेत स्वत: हजर राहुन करावे लागणारे सर्व काम या अॅप्लिकेशनने होणार आहेत. त्यामुळे हे अॅप्लिकेशन अधिक फायदेशीर असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
बंद करा अनावश्यक नोटीफिकेशन
व्हॉटसअॅप ग्रुपवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटचे नोटीफिकेशनपासून त्रस्त झालेल्या वापरकर्त्यांना आता पर्याय उपलब्ध झाला आहे. आता व्हाॅटसअॅपमध्ये सेटिंग करून अनावश्यक नोटीफिकेशन रोखता येऊ शकतात. यासाठी सर्वात आधी आपल्याला ज्या ग्रुपचे नोटीफिकेशन आवश्यक नसतील, असा ग्रुप ओपन करा. येथे ‘म्युट’ नावाचा पर्याय समोर दिसेल. हा पर्याय आपण हवा तेवढे दिवस, वेळ आपण निवडू शकतो. त्याखाली चेक बॉक्स हा पर्याय दिसेल. त्यावर लिहिलेल्या ‘शो नोटीफिकेशन’ हा पर्याय अनसिलेक्ट करून ओके म्हणा. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण सिलेक्ट केलेल्या वेळेत आपल्याला संबंधित ग्रुपचे नोटीफिकेशन दिसणार नाही.
अॅपचे नाव
StateBank Anywhere (स्टेट बँक एनीवेअर)
सोर्स - अॅड्राइड डाउनलोड (गुगल प्ले स्टोअर)
सर्वांत आधी वाचा फेसबुकवर
फेसबुकनेनुकताच न्यूयॉर्क टाइम्स, नॅशनल जीओग्राफीक, बजफीड, एनबीसी, अटलांटिक, गार्जियन, बीबीसी न्यूज, स्पायजेल आणि बिल्ड या नऊ न्युज पब्लिशर्स (वृत्त प्रसारण करणाऱ्या संस्था) सोबत करार करून वापरकर्त्यांसाठी नवीन फीचर्स लॉन्च केले आहे. त्यानुसार आता हे पब्लिशर्स थेट फेसबुकच्या मोबाइल ‘न्यूज फिडस’ या कॉलमवर आर्टिकल, न्यूज प्रसारित करतील. फेसबुकच्या या मोबाइल अॅप्लिकेशनवर आर्टिकल शेअर करण्यासाठी ते १० सेकंद लागतात.
मात्र, या नवीन प्रणालीनुसार ती वेळही १० पटीने वाचणार आहे. त्यामुळे वाचकांना फायदा होईल. वाचकानंा प्रत्येक मिनिटाला नवीन माहिती देण्याचा प्रयत्न या फीचर्समधून करण्यात येणार आहे.