आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोळीवाड्यात नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना, दुसऱ्या दिवशी परिस्थिती नियंत्रणात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - कोळीवाड्यातील वाल्मीकनगरात वाहनाचा धक्का लागून गणेशमूर्ती खाली पडल्यानंतर झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाच संशयितांना पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री अटक केली. तर शुक्रवारी टॉवर चौक ते रथ चौकापर्यंत पोलिसांनी संचलन केले. तसेच दुसऱ्या दिवशीही कोळीपेठेत बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी सकाळी परिस्थितीबाबत आढावा घेतला. दरम्यान, गुरुवारी रात्री उशिरा नवीन गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. 
 
वाल्मीकनगरात उद्भवलेली तणावाची परिस्थिती काही तासात पोलिसांनी नियंत्रणात आणली होती. घटनेनंतर या परिसरात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. वाहनाचा धक्का लागून पडलेल्या मूर्तीचे रात्री विधिवत विसर्जन करण्यात आले. त्यानंतर पोलिस प्रशासनाने नवीन गणरायांची मूर्ती आणली होती. प्रारंभी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यास विरोध दर्शवला होता. मात्र, पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी पदाधिकाऱ्यांची समजूत काढली. त्यानंतर रात्री पोलिस अधिकारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना केली. 
 
आठ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल 
याप्रकरणीआठ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात शेख अासिफ उर्फ अज्जू शेख अजीमोद्दिन (वय २३), शेख यासिन शेख अजीमोद्दिन (वय १८), शेख अजीमोद्दिन शेख गुलाम हुसेन (वय ४५), शेख वसीम शेख अजीमोद्दिन (वय २०) शेख तन्वीर उर्फ तन्या शेख करीम (वय २३) या पाच संशयितांना शनिपेठ पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री अटक केली. तर जिलानी उर्फ जिल्लू शेख गुलाम हुसेन, शोएब शेख एका अनोळखी फरास असून या तीन जणांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. अटकेतील पाचही संशयितांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले. न्यायाधीश एन.के.पाटील यांनी त्यांना एक दिवसाची कोठडी सुनावली. 
 
संचलनात असा होता फौजफाटा 
पोलिसांनीकोळी वाड्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी वाजेच्या सुमारास टॉवर चौक ते रथ चौकापर्यंत संचलन केले. यामध्ये पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलिस अधीक्षक बच्चनसिंग, पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे, शनिपेठ, शहर, रामानंदनगर, जिल्हापेठ या पोलिस ठाण्याचे सर्व प्रभारी, कर्मचारी, दंगा काबू पथकातील कर्मचारी सहभागी झाले होते. 
बातम्या आणखी आहेत...