आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • New Health Sub Centre Set Up Through Human Development Program

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मानवविकास कायक्रमांतर्गत आता नवे आरोग्य उपकेंद्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - राज्याच्या मानवविकास निर्देशांकात वाढ व्हावी या उद्देशाने शासनातर्फे मानवविकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमातून आता अंगणवाडी आणि आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतींचे बांधकाम करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्रांची कामे मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा होईल.

राज्यात मानवविकास कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. त्यानुसार 2011-12 पासून ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या 22 जिल्ह्यातील 125 तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ज्या जिल्ह्यांचा मानवविकास कार्यक्रमात समावेश आहे. त्या जिल्ह्यातील तालुक्यांचा ग्रामीण भाग आणि क वर्ग नगरपालिका क्षेत्रात हा कार्यक्रम राबविला जातो. विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांचा मानवविकास निर्देशांक वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

मानवविकास कार्यक्रमांतर्गत सद्य:स्थितीत राबविण्यात येत असलेल्या योजनांव्यतिरिक्त त्यात नव्याने अंगणवाडी आणि आरोग्य उपकेंद्रासाठी इमारती बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे. कार्यक्रमांतर्गत तालुक्यास प्राप्त होणार्‍या एकूण निधीपैकी 10 टक्के निधीतून जिल्हा मानवविकास समितीच्या मान्यतेने नावीन्यपूर्ण योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे ; परंतु या नावीन्यपूर्ण योजनांऐवजी जिल्हा व तालुका विशिष्ट योजना मानवविकास कार्यक्रमात राबविण्याचा निर्णय घेऊन त्यानुसार या योजनांचा समावेश करण्यात आला.

मानवविकास कार्यक्रमांतर्गत तालुक्यासाठी मिळणार्‍या एकूण निधीच्या 20 टक्के निधी जिल्हा, तालुक्यातील विशिष्ट योजनांवरच खर्च करण्यात यावा असा नियम आहे.


योजनेच्या नावात बदल
मानवविकास कार्यक्रमांतर्गत ‘किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयक बाबी व व्यवसाय कौशल्य विकसित करण्यासाठी प्रशिक्षण देणे’ या योजनेंतर्गत निवड करण्यात येणार्‍यांना जे प्रशिक्षण देण्यात येते. त्यामध्ये ‘पोषण व आहार’ या विषयाच्या प्रशिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित गावातील लाभार्थी महिलांना समुपदेशन करता येणार आहे. पोषण व आहारासंबंधीची माहिती महिला व बालविकास विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.