आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाॅक्टरनेच शोधला हवेतील जैविक प्रदूषणरोधी मास्क, पत्नी डाॅ. विजया यांचे अनमाेल सहकार्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - क्षयरोगाचावाढता फैलाव रोखण्यात उपयोगी ठरणारा मास्क धुळे येथील डाॅ. संजय गायकवाड यांनी शोधून काढला आहे. या मास्कद्वारे हवेतील जैविक प्रदूषण, जंतू रोखण्याची क्षमता ९९.९९ टक्के असून, तो सुरक्षित असल्याचे पेटंटही मिळवले आहे. शिवाय पाच राज्यांत त्याचे सादरीकरणही केले आहे. नारळाची करवंटी पाहून सुचलेल्या या मास्कच्या कल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी डाॅ. गायकवाड यांनी अडीच वर्षे संशोधन केले.

जंतूंमुळे होणाऱ्या संसर्गजन्य रोगांचे प्रमाण हल्ली वाढले आहे. दर तीन मिनिटाला क्षयाच्या दोन रुग्णांचा मृत्यू होतो. देशात २० लाख ३० हजार रुग्ण आहेत. या रुग्णांकडूनही हवेत जंतूंचा फैलाव होतो. हा आजार रोखण्यासाठी औषधींखेरीज दुसरा पर्याय नाही. यातून जैविक प्रदूषण वाढण्याचाही धोका असतो. यामुळेच धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात छातीविकार क्षयरोग शास्त्र िवभागप्रमुख डॉ. संजय गायकवाड यांनी मास्कचे संशोधन सुरू केले. केरळ येथे प्रशिक्षणादरम्यान त्यांना ही कल्पना सुचली होती. तेथे पडलेल्या नारळाच्या करवंटीवरून प्राथमिक स्वरूपात मास्कची रचना डोक्यात बसली. सातत्याने विचारमंथन करून थ्रीडी डिझायनर सागर पाटील यांच्या मदतीने तयार करून घेतले. त्यावर अडीच वर्षे काम केले. नाराळाची करवंटी ते आंतरराष्ट्रीय पेटंटसाठी उपयुक्त असे मास्कचे डिझाईन तयार करुन ते विकसीत करण्यात यश मिळवले. क्षयरुग्णांद्वारे हवेत होणारा जंतुसंसर्ग रोखणाऱ्या मास्कचे संशोधन डाॅ. संजय करत असतानाच मास्कच्या आतील कापडाविषयी संशोधनात त्यांना पत्नी डाॅ. विजया यांचे सहकार्य मिळाले. यामुळे या मास्कचे पेटंट गायकवाड दांपत्याच्या नावावर घेण्यात आले आहे.

मास्क धुऊन वापरता येताे: यामास्कचा मुख्य प्लास्टिकचा भाग हा धुऊन वापरता येणारा आहे. तर आतील कापड हे २४ ते ४८ तासासाठी वापरता येईल. त्यानंतर ते नष्ट करून दुसरे कापड त्या जागी बसवायचे आहे. याप्रकारे तो वापरण्यासाठी सहज सुलभ आहे.
असा आहे मास्क
मास्कचा मुख्य भाग प्लास्टिकचा आहे. आतील बाजूत कापड राहणार असून यात तीन कप्पे राहतील. पहिला कप्पा खोकला, शिंक रोखतो तो प्रवाह दुसऱ्या कप्प्यात सोडला जातो. दुसऱ्या कप्प्यात खोकला िखडकी आहे. ती उघडझाप करणारी आहे. यातून खोकला नियंत्रित करून तो तिसऱ्या कप्यातून हवा शुद्धीकरण होऊन सोडली जाते.

पाच राज्यांतील तज्ज्ञांपुढे प्रेझेंटेशन, ९९.९९ % सक्षम
^गुजरात,राजस्थान, मध्य प्रदेश, गोवा, महाराष्ट्र या राज्यांतील तज्ज्ञांपुढे मास्कचे प्रेझेंटेशन करण्यात आले. यात जंतू रोखण्याची क्षमता ९९.९९ टक्के असल्याचे प्रमाणपत्रही कोईमतूर येथील संस्थेने दिले आहे. भारतीय कंपनीलाच हे संशोधन देण्याचा मानस असून, त्यासाठी ‘स्टॉप टीबी, बाय टीबी ’असे घोषवाक्यही केले आहे. डॉ. संजय गायकवाड, मास्कचे संशोधक