आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरीतील नव्या संधींचे मिळणार धडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - विद्यार्थ्यांनानोकरी, व्यवसायात नवीन संधी कशा उपलब्ध होतील? आलेल्या संधी कशा हाताळायच्या, यासाठी त्यांचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे. हा विकास शिक्षण सुरू असतानाच व्हावा, या उद्देशाने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे ३० प्राध्यापक ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’अंतर्गत नुकतेच म्हैसूर येथून प्रशिक्षण घेऊन आले आहेत. आता हे प्राध्यापक विद्यार्थ्यांना गरजेनुसार प्रशिक्षित करणार आहेत.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून त्यांच्यात कौशल्य विकसित व्हावे, यासाठी इन्फोसिस कंपनीसोबत एक उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत गेल्या वर्षी काही प्राध्यापक पुणे येथे जाऊन आले होते. यंदा म्हैसूर येथे हे प्रशिक्षण झाले. थेट विद्यार्थ्यांना बाहेर घेऊन जाण्यापेक्षा प्राध्यापकांना प्रशिक्षण देऊन विद्यापीठाच्या ‘सेन्ट्रल ट्रेनिंग प्लेसमेंट सेल’तर्फे एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. अशा प्रकारच्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या नोकरी कशा उपलब्ध होतील, यासाठी ते मार्गदर्शक ठरणार आहे. विद्यापीठाने या संदर्भात केलेली सुरुवात चांगली असल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लाभ
याउपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचेही गट तयार केले जाणार आहेत. धुळे, नंदुरबार येथील विद्यार्थ्यांना त्यांच्याच महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाचा अधिक लाभ होईल.

काय असेल प्रशिक्षणात?
सॉफ्टस्किल डेव्हलपमेंट, स्पोकन इंग्लिश, आयटी कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी, मुलाखतीचे तंत्र शिकवले जाईल. त्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची गट (बॅच) तयार करण्यात येईल. त्यानंतर त्यांना विशिष्ट मार्गदर्शन (लेक्चर्स) देण्याची सुविधा विद्यापीठाने केली आहे. गेल्या वर्षीही अशा प्रकारचा प्रयोग करण्यात आला होता.

शाश्वत मनुष्यबळासाठी उपक्रम
शाश्वतस्वरुपाचे मनुष्यबळ तयार करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकसित करण्याचा महत्त्वाचा उद्देश आहे. ‘मेक इन इंडिया’सारख्या केंद्र शासनाच्या उपक्रमांवर आधारित ही संकल्पना आहे. प्रा.डॉ.सुधीर मेश्राम, कुलगुरू, उमवि
बातम्या आणखी आहेत...