आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचऱ्याच्या गाडीला देणार डाॅग व्हॅनचा लूक, पालिकेचा नवीन वाहन खरेदीचा प्रश्न सुटणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातील माेकाट कुत्र्यांचा बंदाेबस्त करण्यासाठी नवीन वाहन खरेदी करणे शक्य नसेल तर अाराेग्य विभागातील कचरा संकलनासाठी खरेदी केलेल्या वाहनाला डाॅग व्हॅनचा लूक देण्याचा पर्याय पुढे अाला अाहे.

कालबाह्य झालेली १३ वाहने निर्लेखित करण्यावर नगरसेवकांनी चर्चा केली. यात डाॅग व्हॅन वगळता अन्य वाहनांचा लिलाव करण्याचा प्रस्ताव सुनील माळी यांनी दिला. मात्र, कायद्याने निर्लेखित वाहने रस्त्यावर चालवणे शक्य नाही. तसेच त्याची दुरुस्तीही हाेऊ शकत नाही.
त्यामुळे वाहनांच्या लिलावातून मिळणाऱ्या पैशात नवीन वाहने खरेदी करावी, असाही मुद्दा मांडला. तसेच खरेदी केलेल्या १० वाहनांपैकी एका वाहनाला डाॅग व्हॅनसारखा पिंजारा तयार करून त्याचा वापर करावा, असा प्रस्ताव देण्यात अाला. त्यावर विशेष लेखापरीक्षक एस.बी.भाेर यांनीही हरकत नसल्याचे सांगितले.