आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाह उरकून येताना वधू अर्ध्यातून माघारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - दलालाच्यामाध्यमातून सोलापूरकडील वधू पाहिली... कपडेलत्ते दागिन्यांवर मोठा खर्च केला.. अक्कलकोट तालुक्यात विवाहही उरकला... मात्र, त्यानंतर वधूसह धुळ्याकडे परतणा-या नवरदेवाला मनमाड रेल्वेस्थानकावर सोडून वधूने पुन्हा आपल्या गावाकडे पलायन केले... धुळ्यापर्यंत यायचे आमच्या दलालाने सांगितले नव्हते, असे सांगून तिने कपडे दागिन्यांसह परतीचा प्रवास सुरू केला. त्यामुळे नवरदेवाचे संसाराचे स्वप्न तर भंगलेच; पण दागिने कपड्यांवर खर्च केलेले लाखो रुपयेही गेले. तसेच आता पाेलिसही या प्रकरणाची दखल घ्यायला तयार नाहीत.
शहरातील मोहाडी उपनगरातील अशोक बाबूराव वाणी यांना मुलासाठी अक्कलकोट तालुक्यात स्थळ असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे ते सोलापूर जिल्ह्यात दाखल झाले. त्यासाठी त्यांनी महेश भोसलेची मदत घेतली. हा विवाह जुळवण्यासाठी भोसलेने अशोक वाणी यांच्याकडून तब्बल २५ हजार रुपये वसूल केले. त्यानंतर अक्कलकोटजवळ उर्वरितपान
असलेल्याएका गावातील मंदिरात वाणी यांचा मुलगा गणेश पिंगळेचा विवाह पार पडला. विवाह पार पडल्यानंतर ते धुळ्याकडे येत असताना नववधूही सोबत होती. दरम्यान, नवविवाहितेसह वाणी परिवार मनमाड रेल्वेस्थानकावर पोहोचला असताना तिने धुळ्याला सासरी येण्यास चक्क नकार दिला. तिच्या या अनपेक्षित वर्तनाने वाणी कुटुंबीय हादरले. या वेळी ते नवविवाहितेसह तिच्या नातलगांच्या हातपाय पडले, गयावया केली. मात्र, तरीदेखील तिने त्यांचे काहीही ऐकून घेतले नाही. नवविवाहितेला दिलेले सोने-चांदीचे दागिने कपड्यांचे पैसे परत करा, असे वाणी कुटुंबीयांनी सांगितल्यावर तिच्या नातलगांनी दागिने परत करण्यास नकार दिला आमच्या एजंटशी चर्चा करा, असे सांगत तेथून पोबारा केला. या प्रकारामुळे वाणी यांची पत्नी आजारी पडली. यासंदर्भात ते मोहाडी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता, गुन्हा दाखल करण्यासाठी साेलापूरला जा, असे सांगत पोलिसांनी नकार दिला. त्यामुळे व्यथित झालेल्या वाणी कुटुंबीयांनी गायत्री सोशल वेल्फेअर संस्थेकडे तक्रार करीत मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
मुलाचाविवाह होत असल्याने सर्वच आनंदात होते. दलालाने मुलीच्या नातेवाइकांना हाताशी धरून लाखात लुबाडले. त्यानंतर दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, ते ओळख दाखवण्यासही तयार नाहीत. तसेच पोलिसही सहकार्य करत नाही. त्यामुळे दाद मागावी कोणाकडे? अशोकबाबुराव वाणी, पीडितपालक

...अन् सनई रुसली
अशोकवाणी यांनी मुलाच्या विवाहसाठी माेठ्या कष्टाने दीड लाख रुपये जमवले होते. हा विवाह जुळवण्यासाठी दलाल महेश भोसलेला २५ हजार रुपये दिले. तसेच कपडे, सोने-चांदी खरेदी विवाहावर एक लाख २५ हजार रुपये खर्च केले. ही रक्कमही परत मिळाली नाही समाजात नाचक्कीदेखील झाली आहे. ज्या घरात सनई-चौघडे वाजणार होते तेथे सध्या दु:खमय वातावरण आहे. दरम्यान, सध्या काही ठिकाणी दलालांच्या टोळ्याच सक्रिय झालेल्या आहेत.