आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुसावळ-चाळीसगावचा पास आता 440 रुपयांना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - रेल्वे मंत्रालयाने केलेल्या भाडेवाढीची अंमलबजावणी शनिवारपासून सुरू झाली असून, त्याचा सर्वाधिक फटका अप-डाऊन करणा-या चाकरमान्यांना बसला आहे. भुसावळ-जळगाव अप-डाऊन करणा-यांना आता 160ऐवजी 185 रुपये मोजावे लागतील. पॅसेंजरचे तिकीट ‘जैसे थे’ असले तरी, एक्स्प्रेसचे तिकीट मात्र 30वरून 35 रुपये झाले आहे.

आर्थिक स्रोत मर्यादित असल्याने रेल्वेची विकासकामे रखडल्याचे कारण पुढे करून सरकारने भाडेवाढ केली. या भाडेवाढीचा जास्त फटका भुसावळहून अप-डाऊन करणा-यांना बसला आहे. चाकरमान्यांना लागणा-या दरमहा पासच्या दरातही रेल्वेने वाढ केली आहे. किलोमीटरनुसार दरवाढीचा प्रस्ताव चार दिवसांपूर्वीच रेल्वे प्रशासनाला प्राप्त झाला होता. मात्र, त्यात रेल्वे मंत्रालयाने बदल करून दरमहा पाससुद्धा 14.2 टक्के दरवाढीचा निकष लावला. नवीन दरवाढीची अंमलबजावणी शनिवारपासून सुरू झाली आहे. दरम्यान, अप-डाऊनसाठी मिळणा-या पासेस केवळ 150 किलोमीटर अंतरासाठीच मिळतात.
एक्स्पे्रसला पाच रुपये जास्त
भुसावळ जंक्शन स्थानकावरून जळगावला जाण्यासाठी एक्स्प्रेस गाडीच्या तिकिटाकरिता 30 रुपये लागत होते. आता भाढेवाढीमुळे प्रवाशांना 5 रुपये जास्त मोजावे लागतील. पॅसेंजरचे तिकीट वाढले नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
नवीन पासेसचे दर (भुसावळपासून)
रेल्वेस्थानक जुने दर नवे दर
जळगाव 160 185
पाचोरा 310 355
चाळीसगाव 385 440
रावेर 160 185
बºहाणपूर 235 270
बोदवड 160 185
नांदुरा 310 355
मलकापूर 235 270
अकोला 460 525
अंमलबजावणी
- रेल्वे मंत्रालयाने प्रवासी गाड्यांचे भाडे व पासच्या दरात वाढ केली आहे. दरवाढीच्या निर्णयाची अंमल- बजावणी सुरू झाली आहे. पासधारकांना शनिवारपासून नवीन दरानुसार पास दिले जात आहेत. 14.2 टक्केवाढीव दरानुसार तिकीट वितरण होत आहे. एन.जी.बोरीकर,वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक