आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नव्या पोलिस वसाहतीसाठी निविदा प्रक्रियेला सुरुवात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता, नवीन डीवायएसपी कार्यालय, तालुका पोलिस ठाणे अन् कंट्रोल रूमसह नव्या पोलिस वसाहतीचे बांधकाम जामनेर रोडवरील नियोजित जागेवर व्हावे, अशी दीर्घकाळापासूनची मागणी आहे. त्यानुसार डीवायएसपी कार्यालयासह नियोजित जागेवर पोलिस कर्मचाऱ्यांसाठी १५१ निवासस्थाने उभारण्यासाठी पोलिसांच्या गृहनिर्माण विभागाने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. आगामी सहा महिन्यांच्या कालावधीत या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात केली जाणार असल्याचे संकेत अाहेत.

जामनेर राेडवरील साईबाबा मंदिरासमाेर पाेलिस प्रशासनाची हेक्टर ५० अार जागा अाहे. अगदी रस्त्याच्या कडेलाच लागून ही जागा असून या जागेवर नवीन पाेलिस वसाहतीचे बांधकाम हाेणार अाहे. याच जागेवर पोलिस कर्मचाऱ्यांसाठी १५१ निवासस्थानेही बांधली जाणार आहेत. या जागेवर डीवायएसपी कार्यालयासह तालुका पाेलिस ठाणे पाेलिस कंट्राेल रूमची निर्मिती केली जाणार अाहे. त्यानुसार प्रशासकीय कार्यवाही सुरू झाली आहे. पाेलिसांच्या गृहनिर्माण विभागाने यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली अाहे. तत्पूर्वी बुलडाणा येथील वास्तुविशारदांनी जागेची पाहणी करून, बांधकामाचा प्लॅन तयार केला अाहे. चार महिन्यांपूर्वीच बांधकामाचा प्लॅन तयार झाला असून मंुबई येथे गृहनिर्माण विभागाकडे हा प्लॅन मंजुरीसाठी पाठवण्यात अाला अाहे. डीवायएसपी राेहिदास पवार यांनी याप्रकरणी लक्ष घातले अाहे.

नवीन जागेतील बांधकामाचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवला अाहे. प्रस्तावास मान्यता मिळाल्यावर येत्या सहा महिन्यांत बांधकामास प्रारंभ केला जाईल. तालुका पाेलिस ठाणे तयार झाल्यावर त्या पाेलिस ठाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. पाेलिस गृहनिर्माण विभागात याबाबत पाठपुरावा सुरू अाहे. राेहिदासपवार, डीवायएसपी, भुसावळ

वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला सुरू
काेटी ७३ लाख निधी मंजूर : जामनेरराेडवरील पाेलिस वसाहतीसाठी काेटी ७३ लाख रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला अाहे. त्या निधीतूनच कामाला सुरुवात केली जाणार अाहे. पाेलिस कंट्राेल रूम, तालुका पाेलिस ठाणे, डीवायएसपी कार्यालयासह कर्मचारी निवासस्थानांचे बांधकाम होणार आहे. दाेन टप्प्यात हे काम केले जाणार अाहे. पहिल्या टप्प्यात डीवायएसपी कार्यालय, तालुका पाेलिस ठाणे पाेलिस कंट्राेल रूमचे बांधकाम केले जाणार अाहे. नंतर दुसऱ्या टप्प्यात पाेलिस निवासस्थानांचे बांधकाम होईल. यासाठी पाेलिस प्रशासनाने नियाेजन केले अाहे. त्यानुसार प्रशासकीय प्रक्रियेला सद्यस्थितीत गती मिळाली आहे.
इमारत झाली जीर्ण
सध्या अारपीडी राेडवरील पाेलिस वसाहतीत १० इमारती अाहेत. या इमारती जीर्ण झाल्या असून त्यांची दुरुस्ती रंगरंगाेटी, फुटलेल्या पाइपांची दुरुस्ती, बंद पथदिवे सुरू करणे अशी कामे गरजेची आहेत. निवासस्थाने अपुरी पडत असल्याने अनेक पाेलिस कर्मचारी शहरात भाड्याने घर घेऊन राहतात. त्यामुळे नवीन पोलिस कर्मचारी वसाहतीचे बांधकाम होणार आहे.

पाेलिस गृहनिर्माण विभागाकडे प्रस्ताव : भुसावळयेथील डीवायएसपी कार्यालयासह इतर बांधकामाचा प्रस्ताव वास्तुविशारदांनी मुंबई येथे पाेलिस गृह विभागाकडे पाठवला आहे. त्यानुसार बांधकामासाठी निधीही मंजूर झाला अाहे. बांधकामाच्या नियाेजनास मान्यता मिळताच आगामी सहा महिन्यांत बांधकामाला सुरुवात हाेणार अाहे. शहरापासून काही अंतरावर ही जागा असली, तरी भविष्याच्या दृष्टीने सोयीची आहे. याच ठिकाणी तालुका पोलिस ठाणे, पोलिस कर्मचारी वसाहत निर्माण केली जाणार असल्याने त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांना सुविधा मिळेल. तसेच कामकाजालाही गती मिळणार आहे.