आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोरी नदीवर चार बंधा-यांना मंजुरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमळनेर - लघुसिंचन व जलसंधारण मंत्रालयाच्या माध्यमातून अमळनेर तालुक्यासाठी चार नवीन छोट्या बंधा-यांना मंजुरी मिळाली आहे. आमदार साहेबराव पाटील यांच्या प्रयत्नांमुळे 30 जून रोजी या कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे बोरी नदीवर ठिकंिठकाणी जलसाठे उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हा मंत्र
यशस्वी होईल.

पावसाळ्यात बोरी नदीसह इतर नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर येत असतो. मात्र, महाळपूर ते अमळनेर या अंतरात केवळ फाफोरे गावाजवळ एक जिल्हा परिषदेच्या निधीतून साकारण्यात आलेला लघुसिंचन बंधारा सोडला तर पाणी अडवण्यासाठी कोणताच बंधारा बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे या परिसरातून मोठ्या प्रमाणावर पाणी नदीद्वारे वाहून जाते. त्यामुळे या अंतरात असलेल्या गावांना सिंचनाची सोय नव्हती. त्यामुळे पाणीपुरवठा करणा-या विहिरींच्या जलपातळीत मोठी घट दिसून येत असे. पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ्यात आवर्तन सोडावे लागते. यावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी आमदार साहेबराव पाटील यांनी या जागेत नवीन चार बंधा-यांचा प्रस्ताव पाठवला होता. त्याला जलसंधारण मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंजुरी दिली आहे. यामुळे परिसरातील गावांना पाण्याचा लाभ मिळेल.

येथे मिळाली मंजुरी
बोरी नदीवर महाळपूर, शिरसोदे, कोळपिंप्री, खळेश्वर या चार ठिकाणी बंधारे बांधण्यास मंजुरी मिळाली आहे. यातील खळेश्वर बंधा-याने अमळनेरकर शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा लाभ होणार आहे. तर यामुळे बोरी नदी परिसरातील शेतीची सिंचनाची सोय होईल व पिण्याच्या पाण्याचीही मोठी समस्या सुटण्यास मदत होणार आहे. बोरी नदीवर मोठ्या प्रमाणात अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठीच्या विहिरी आहेत. त्यांनाही लाभ होईल. त्यामुळे भिलाली केटीवेअर बंधा-यासह हे चार नवीन बंधारे बोरी नदीच्या काठावरील गावांना जीवनदायी ठरणार आहेत.

निविदा काढावी
- जळगाव येथील जिल्हाधिका-यांनी 15 फेब्रुवारी 2014 रोजी झालेल्या शासनाच्या निर्णयानुसार 10 दिवसांच्या आत निविदा काढावी. तसेच लघुसिंचन कामांसाठी अल्प कालावधीच्या निविदा सूचना प्रसिद्ध व्हाव्यात, अशी आम्हाला अपेक्षा आहे. साहेबराव पाटील, आमदार

असा मिळेल निधी
गावाचे नाव मिळणारा निधी जलसाठा (मी.) सिंचनक्षेत्र (हे.)
महाळपूर 53 लाख 54 हजार 140 88
शिरसोद 54 लाख 30 हजार 140 90
कोळपिंप्री 53 लाख 40 हजार 138 89
खळेश्वर 52 लाख 58 हजार 150 87