आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षक भरतीला परवानगी नको

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावदा - येथील आ.गं.हायस्कूलमधील शिक्षक भरतीला माध्यमिक शिक्षण विभागाने परवानगी देऊ नये, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक राजेश वानखेडे यांनी केली आहे. यासंदर्भात वानखेडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आ.गं.हायसकूलमध्ये दोन आणि कनिष्ठ लिपिकाचे एक पद रिक्त आहे. यासंदर्भात पालिकेच्या शाळा समन्वय समितीच्या अध्यक्षांनी या जागा भरण्यासाठी शिक्षणाधिकार्‍यांकडे परवानगी मागितली आहे.
तथापि शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी राज्यातील सर्व शाळांची पटपडताळणी केल्याने अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. अतिरिक्त ठरणार्‍या या कर्मचार्‍यांचे जोपर्यंत दुसर्‍या शाळांमध्ये समायोजन होत नाही. तोपर्यंत कोणत्याही जिल्हामध्ये शिक्षणाधिकार्‍यांनी शिक्षक व कर्मचारी भरतीची परवानगी देऊ नये, असे आदेश काढले आहेत. या आदेशाची दखल घेऊन सावदा आ.गं.हायस्कूलमधील कर्मचारी भरतीला परवानगी देऊ नये, अशी मागणी राजेश वानखेडे यांनी शिक्षणाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
रवींद्र पाटलांचे नाव द्या - जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई असताना सावदा शहर त्या तुलनेत टंचाईमुक्त आहे. तत्कालीन नगराध्यक्ष रवींद्र विष्णू पाटील यांनी दूरदृष्टी ठेवून हतनूर धरणाच्या बॅक वॉटरमधून ही पाणीपुरवठा योजना करून घेतली होती. पाटील यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना जलसम्राट पुरस्कार द्यावा, पालिकेच्या बैठक सभागृहाला बाळासाहेब रवींद्र विष्णू पाटील असे नाव देण्याची मागणी, नगरसेवक वानखेडे यांनी केली आहे.