आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॅपटॉपला कमांड इशा-याची, ‘रिमोट’ आवाजाचा!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - तंत्रज्ञानात दिवसेंदिवस बदल होत आहेत. कंपन्यांकडून नवनवीन मोबाईल, लॅपटॉप, टॅब्लेट पीसी बाजारात येत आहेत. वस्तूंना आकर्षक लूक देऊन
लाइफस्टाइल बदलत आहे. त्यात इशा-यावर चालणारा लॅपटॉप, जगातील सर्वात स्लीम आणि आवाजावर नियंत्रित होणा-या टीव्हीचाही समावेश आहे. लूकसोबतच गुणवत्तेवर देखील भर देण्यात येत आहे.
इंटेलच्या चीपच्या आधारे कंपन्या अल्ट्राबुक्स (लॅपटॉप) सादर करणार आहेत. लेनोव्हो, एसर, सॅमसंग, तोशिबा, एलजी आणि एचपीच्या अल्ट्राबुक्ससोबतच अत्याधुनिक असा ‘निकिसकी’ लॅपटॉपही इंटेलने सादर केला. विंडोज 8 ने समृद्ध निकिसकीमध्ये कीबोर्डखाली पारदर्शक टचपॅड पॅनल आहे. लॅपटॉप बंद असला तरी बाहेरूनही स्क्रीन दिसेल आणि न उघडताच त्यावर काम करता येईल.
एसडी असोसिएशनने सादर केलेल्या मेमरी कार्डमध्ये लॅन फिचर देण्यात आले आहे. अर्थात तारेशिवाय छायाचित्रे, व्हिडिओ व इतर डाटा कॅमे-यातून ट्रान्सफर करणे यामुळे सहज शक्य होईल.
मायक्रोसॉफ्ट किनेक्ट - मायक्रोसॉफ्ट किनेक्ट लाँच केले आहे. फेब्रुवारीत ते बाजारात येईल. सध्या हे फीचर मोजक्या देशांत मिळेल. कीबोर्ड किंवा माऊसशिवाय यामुळे सिस्टिम नियंत्रित होऊ शकेल.
काचेचा लॅपटॉप - वेष्टण, डिस्प्ले, पामरेस्ट काचेचा असलेला एचपीचा एन्व्ही 14 हा पहिलाच लॅपटॉप आहे. पुढच्या महिन्यात 1400 डॉलर्स (72,800 रुपये) किमतीत तो उपलब्ध होईल.
सर्वात स्लीम टीव्ही - याशिवाय एलजीने 55 इंची ओएलईडी टीव्ही सादर केला. त्याची जाडी फक्त 4 मि.मी. आहे तुलनात्मकदृष्ट्या तो सॅमसंगच्या गॅलक्झी एस2 स्मार्टफोनपेक्षाही स्लीम आहे.
आवाज ऐकून टीव्ही चालणार - आवाजावर नियंत्रित होणारे तंत्रज्ञान सॅमसंग विकसित करत आहे. कंपनीच्या स्मार्ट टीव्हीचे व्हॉइस फंक्शन ऑन करण्यासाठी फक्त ‘हाय टीव्ही’ एवढेच म्हणावे लागेल. ‘वेब ब्राउझर’ म्हणताच तो ऑनलाइन होईल. हातांच्या इशा-यांवर आवाज नियंत्रित करता येईल.