आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे तीन वर्षांत धावणार..!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्ग होणार, हे पहिल्यापासून सांगत आहे. विरोधकांनी अनेक अडथळे आणल्यानंतरही 12 डिसेंबर 2007मध्ये या रेल्वेमार्गासाठी आंदोलन केले. त्यामुळेच रेल्वेमार्गाला नियोजन आयोगाने मंजुरी दिली आहे. विरोधकांनी आता कोणताही अडथळा निर्माण केला तरी येत्या तीन वर्षांत रेल्वे धावेल, असा दावा आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केला.
रेल्वेमार्गाला नियोजन आयोगाने मंजुरी दिल्याचे पत्र खासदार प्रतापराव सोनवणे यांनी प्रसिद्धीस दिल्यानंतर आमदार गोटे यांनी याच प्रश्नाच्या पाठपुराव्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी ते म्हणाले की, शहरात घेतलेल्या जाहीर सभेत तीन महिन्यांत रेल्वेमार्गाला नियोजन आयोगातर्फे मंजुरी देण्यात येईल, असे सांगितले होते. रेल्वे अर्थसंकल्पानंतर खान्देशवर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया अनेकांकडून देण्यात आली; परंतु हा रेल्वेमार्ग आपल्या जीवनाच्या अजेंड्यावरील पहिल्या क्रमांकाचा विषय असल्याने त्यासाठी व्यक्तिश: सातत्याने प्रयत्नशील होतो. अर्थसंकल्पानंतरही या रेल्वेमार्गाचा प्रo्न सुटणार असल्याचे सांगितले होते. त्यावर विरोधकांनी आमदार गोटे दिशाभूल करत असल्याचा आरोप केला होता. या मार्गाच्या 365 किलोमीटरचा एकत्रित सव्र्हे होऊन रेल्वेमार्गाच्या फायद्या-तोट्याबाबत विचारच झाला नव्हता. ब्रिटिशांनी 1908मध्ये सर्वात प्रथम या मार्गाचे एकत्रित सर्वेक्षण केले होते. त्यानंतर सन 2002मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री नीतिशकुमार यांनी सर्वेक्षण केले. त्याआधी मनमाड-धुळे, धुळे-शिरपूर असे चार तुकड्यात सर्वेक्षण झाले होते. ही बाब नीतिशकुमार यांच्या लक्षात आणून दिली. त्यानुसार धुळ्यात झालेल्या सभेत नीतिशकुमार यांनी रेल्वेमार्गाच्या एकत्रित सर्वेक्षणाची घोषणा केली होती.
मी तुरुंगातून बाहेर येण्यापूर्वी या रेल्वेमार्गाकडे कुणीही लक्ष दिले नव्हते. त्यानंतर आंदोलनाची घोषणा करण्यासाठी सभा बोलावली होती. या सभेला तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांना बोलावले होते; परंतु त्यांना विरोधकांनी धुळ्यात येऊ दिले नाही. 12 डिसेंबरला केलेले आंदोलन जनतेच्या पाठिंब्याने यशस्वी झाले. त्यानंतर 150पेक्षा अधिक सभा रेल्वेमार्गावरील गावात घेऊन जागृती केली. त्या वेळी शेतकर्‍यांना जमिनी न विकण्याचा सल्ला दिला होता. महाराष्ट्र व मध्य प्रदेश सरकारने या मार्गाचा निम्मा खर्च करण्याची तयारी दर्शविली. महाराष्ट्रात नेतृत्व बदल होऊन पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले. त्यामुळे या मार्गाचे भाग्य उजाळले.
पृथ्वीराज चव्हाण पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री असताना त्यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांना रेल्वेमार्गाबाबत पत्र लिहिले होते. त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यानंतर चव्हाण यांनी या प्रo्नाकडे विशेष लक्ष दिले. या मार्गाला आता नियोजन मंडळाने मंजुरी दिली. रेल्वेमार्गाचे काम लवकरच सुरू होईल. मार्गासाठी केवळ भूमिपूजनाचा सोपस्कार बाकी आहे. कोणत्याही तांत्रिक मंजुरीची, जमीन संपादनाची अडचण नसल्याने येत्या तीन वर्षांत मनमाड-इंदूर रेल्वे धावेल, असा दावा आमदार गोटे यांनी केला आहे. रेल्वेमार्गाचे र्शेय केवळ आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांसह नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या तिघांना आहे. याशिवाय इतर कोणीही रेल्वेमार्गाचे र्शेय घेऊ नये, असेही ते म्हणाले.
सफारी गार्डन होणार - पत्रकार परिषदेत रेल्वेमार्गाला विरोध दर्शविणार्‍या विरोधकांचा समाचार घेत आमदार गोटे यांनी प्रत्येक कामाला विरोध करणार्‍यांकडून बंद पाडण्यात आलेल्या सफारी गार्डनचेही काम लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत दिले; परंतु त्यावर अधिक माहिती देण्याचे त्यांनी टाळले.