आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणींमध्ये सध्या क्राॅप टाॅप, पलाजाे पॅन्टचा ट्रेंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महाविद्यालये सुरू झाले असून सध्या तरुणी अाणि किशाेरवयीन मुलींमध्ये फॅशनचा बाेलबाला अाहे. मुलींच्या नवीन खरेदीसाठी अाता बाजारही सज्ज झाले अाहेत. अनेक प्रकारचे ड्रेसेस पाहायला मिळत अाहेत. त्यामुळे मुलींच्या वाॅर्डराेबमध्ये अनेक प्रकारच्या स्टाइलिश कपड्यांचा समावेश व्हायला सुरुवात झाली अाहे. यामध्ये खास करून सध्या क्राॅप टाॅपचा ट्रेंड तरुणींमध्ये पाहायला मिळत अाहे.

बाजारातही याचप्रकारच्या टाॅपला अधिक पसंती तरुणींकडून मिळत अाहे. याचबराेबर फ्लाेरल प्रिंटच्याही काही टाॅपची मागणी अाहे. अारामदायी असणारे क्राॅप टाॅप दमट वातावरणात काहीसे कुल लूक देतात. याेग्य पद्धतीने या टाॅप अाणि पॅन्टचे समीकरण, रंगसंगती जुळवली तर ही स्टाइल जरा हटकेच दिसते. पॅन्ट स्टाइलमध्येही पलाजाेची क्रेझ अाहे. रंगीबेरंगी अाणि निरनिराळ्या कापडाच्या प्रकारात हे पलाजाे उपलब्ध अाहेत. शिफाॅन, हाेजिअरी सारख्या प्रकारातील पलाजाे पाहायला िमळत असून साध्या रंगांसह बारीक प्रिंटेड, फ्लाॅवर डिझाइनमध्येही हे पलाजाे उपलब्ध अाहेत. तरुणींमध्ये या हटके लूकची मागणी अाहे.
क्राॅप टाॅप वापरताना घ्यायला हवी काळजी
हेटाॅप वापरायचे असल्यास हिल्सच्या सॅन्डलसाेबत तुम्ही वापरू शकतात. जास्त बारीक किंवा नेटचे, पातळ टाॅप घेण्यापेक्षा साधे सिंपल लूक देणाऱ्या टाॅपची निवड करा. अात्मविश्वास अाणि अारामदायी असाल तरच हे टाॅप घालावे अन्यथा वापरू नका. त्याचबराेबर जॅकेट साेबतही हे टाॅप घालू शकता.
वेगळे लूक
याक्राॅप टाॅप्सला काेणत्याही प्रकारच्या पॅन्टस‌् वर वापरता येते. यासाेबत स्कर्ट, पलाजाे, जीन्स, जेगीन्स, कॅप्री यासारख्या काेणत्याही प्रकारासाेबत वापरू शकतात. प्रत्येक प्रकारासाेबत जरा वेगळा लूक तुम्हाला मिळताे. यासाेबतच फंकी ज्वेलरी वापरल्यास यामध्ये रंगीबेरंगी बीडस् ज्वेलरी घातली तर अाणखी चांगले दिसते.
बातम्या आणखी आहेत...