आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे : नव्या दारू दुकानांना परवाने नाकारा, तीव्र आंदोलनाचा दिला इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना निवेदन देताना प्रमोद नगरातील नागरिकांनी असा घेराव घातला. - Divya Marathi
उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना निवेदन देताना प्रमोद नगरातील नागरिकांनी असा घेराव घातला.
धुळे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गापासून ५०० मीटर अंतरावरील दारू दुकाने बंद करण्यात आली अाहेत. ही दुकाने आता उच्चभ्रू नागरी वसाहतींमध्ये जात आहेत. मात्र, नागरिकांचा या दारू दुकानांना मोठ्या प्रमाणात विरोध सुरू आहे. देवपुरातील कॉलनी परिसरात १० ते १२ दारू दुकाने सुरू करण्यासाठी प्रस्ताव दाखल झाले आहेत. याला परवानगी देऊ नये. तसेच या परिसरात कोणतेच दारू दुकान सुरू करण्यात येऊ नये अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे. या मागणीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन देण्यात आले. 
 
राज्य राष्ट्रीय महामार्गापासून ५०० मीटरपर्यंतच्या हद्दीतील परमिटरूम, वाइन शॉप, बिअरबार बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानुसार ही दुकाने बंद झाली असून, आता मद्यसम्राटांकडून ही दुकाने नागरी वसाहतींमध्ये महामार्गापासून ५०० मीटर आत सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या सर्व प्रकरणात मद्यसम्राट आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस अधीक्षक यांची दिशाभूल करीत आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत आहे.
 
या नागरी परिसरात परमिटरूम, बिअरबार, वाइन शॉप सुरू झाले तर सामान्य नागरिक, महिला, तरुणींना रस्त्यावरून चालणे अवघड होणार आहे. या परिसरात गुंड, टवाळखोर, टारगटांची संख्या वाढून सामान्यांचे जगणे अवघड होईल. त्यासाठी या परिसरात नवीन मद्य दुकाने सुरु करण्यात येऊ नये, अशी मागणी परिसरातील नागरिकांतर्फे करण्यात आली आहे. यावर उत्पादन शुल्क विभागाच्या उपअधीक्षकांना निवेदन देण्यात आले.
 
या परिसरात मद्यविक्रीच्या दुकानांना देण्यात आलेली परवानगी तातडीने रद्द करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रतिभा चौधरी, मधुकर पाटील, अंजन बोरसे, सुरेश भदाणे, मिलिंद मुडावदकर, केदार जोशी, ए.सी. चौधरी, शैला कुलकर्णी, सागर चौधरी, मधुकर पाटील, मंदाकिनी पाटील, वैशाली पाटील, संतोष भदाणे यांनी दिला आहे. 
 
१० दुकानांचे प्रस्ताव 
देवपुरातील जयहिंद कॉलनी, आनंदनगर, मयूर कॉलनी, प्रमोदनगर, प्रोफेसर कॉलनी, वाडीभोकर रोड, भरतनगर, एसआरपी कॉलनी, नकाणे रोड, रामनगर या परिसरात साधारण १० ते १२ दुकाने सुरू करण्याचे प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सादर करण्यात आले आहेत. या परिसरात वेगवेगळ्या शाळा, महाविद्यालयांची संख्या अधिक आहे. वाडीभोकर रोडवर सद्य:स्थितीत एक बार सुरू आहे. त्याच्यालगत नवीन परमिटरूम वाइन शॉपला परवानगी दिली. 
 
बातम्या आणखी आहेत...