आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिव्हिलमध्ये नवजात बालकाचा अखेर मृत्यू, उपचारात कोण पडले कमी?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- व्हेंटिलेटरवर असलेल्या नवजात बालकाच्या वैद्यकीय खर्चाचे बिल वाढत असल्याने ऑर्किड मल्टिसुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलेल्या बालकाचा सोमवारी मृत्यू झाला.
वैद्यकीय खर्च वाढत असल्याने संबंधित बालकाचे वडील दीपक सोनी (पानसेमल, जि. बडवानी, म.प्र) यांनी पत्नीसह मुलास जिल्हा रुग्णालयात हलवण्याची मागणी केली होती. १८ दिवसांच्या उपचाराचा खर्च ९४ हजार रुपये झाला होता. त्यातील ५० हजार रुपये दीपक सोनी यांनी जमा केले होते. मात्र, त्यानंतर पूर्ण बिल दिल्यावरच अन्य ठिकाणी हलवता येईल, असा पवित्रा ऑर्किड रुग्णालयाच्या प्रशासनाने घेतला होता.
दरम्यान, याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर सोनी यांनी उर्वरित पैसे पाच दिवसांत देण्याची लेखी हमी दिल्याने या नवजात बालकाला शुक्रवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते. मात्र, तीन दिवसांच्या उपचारानंतर सोमवारी दुपारी त्याचा अखेर मृत्यू झाला. त्यामुळे बालकावर उपचार करण्यात कोण कमी पडले त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आम्ही बालकावर परिपूर्ण उपचार केले
- आमच्या हॉस्पिटलमध्ये त्या बालकावर परिपूर्ण उपचार झाले होते. मात्र, त्यानंतरही त्याची अवस्था चिंताजनक होती. व्हेंटिलेटरसह अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार केले. त्याच्या पालकांनी अन्यत्र हलवण्याचा आग्रह केल्याने त्यास मान्यता देण्यात आली. बालकाची प्रकृती चिंताजनकच होती. याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून उर्वरित बिलाबाबत ठरवले जाईल.
डॉ. अजितकुमार, प्रशासकीय अधिकारी, ऑर्किड हॉस्पिटल
बातम्या आणखी आहेत...