आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांचा विश्वास संपादन करून सुव्यवस्था राखणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पाेलिसदलात काम करताना नागरिकांचा विश्वास संपादन करणे सर्वांत महत्त्वाचे असते. त्यामुळे नागरिकांचा विश्वास संपादन करून त्यांना साेबत घेऊन जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करणार असल्याची माहिती जिल्ह्याचे नवनियुक्त पाेलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिली. गुरुवारी पाेलिस अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ते सायंकाळी वाजता पत्रकारांशी बाेलत हाेते. या वेळी अपर पाेलिस अधीक्षक बच्चन सिंग उपस्थित हाेते. 
 
जिल्हा जातीयदृष्ट्या संवेदनशील अाहे. त्यामुळे जातीय तणाव, दंगली हाेऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ नये, याकडे प्राधान्याने लक्ष देणार असल्याचे कराळे यांनी सांगितले. तसेच गुन्हे उघडकीस अाणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

सकाळीघेतला पदभार 
पोलिस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांची नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीत बदली झाली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी नाशिक शहराचे उपायुक्त दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती झाली. तसेच अपर पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचीही वाशीम येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी बच्चन सिंग यांची नियुक्ती झाली होती. गुरुवारी सकाळी ११.३० वाजता कराळे यांनी पोलिस अधीक्षक डॉ. सुपेकर यांच्याकडून पदभार स्वीकारला. या वेळी पोलिस दलातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 
 
प्रभारी अधिकाऱ्यांची घेतली बैठक 
पाेलिसअधीक्षक पदाचा पदभार घेतल्यानंतर कराळे यांनी गुरुवारी दुपारी जिल्ह्यातील सर्व पाेलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात जिल्ह्यातील नेमक्या समस्या, अडचणी काय अाहेत? पाेलिस ठाण्यांमधील कर्मचारी संख्या नेमकी किती अाहे? जिल्ह्यात काेणत्या प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण अधिक अाहे? ज्वलंत प्रश्न काेणते अाहेत? तसेच काेणत्या विषयांकडे लक्ष दिले पाहिजे? या सर्व गाेष्टींची चर्चा त्यांनी प्रभारी अधिकाऱ्यांशी केली. तसेच कम्युनिटी पाेलिसिंगवर भर देण्याच्या सूचना त्यांनी पाेलिस अधिकाऱ्यांना दिल्या. 

पाेलिसांबद्दल अास्था 
जिल्ह्याचे नूतन पाेलिस अधीक्षक कराळे हे मूळचे सांगली येथील अाहे. त्यांचे वडील राजाराम कराळे हे पाेलिस दलात कर्मचारी हाेते. त्यामुळे पाेलिसांबद्दल अास्था असल्याने पाेलिसांच्या अडचणी, समस्या चांगल्या पद्धतीने माहित अाहेत. त्या दूर करून त्यांच्याकडून चांगले काम करून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...