आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Newly Collector Dr. Arjun Deore Facilated At Waghali

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्हाधिकारी झालेल्या डॉ.अर्जुन देवरे यांचा वाघळी येथे सत्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डॉ. अर्जुन देवरे यांनी यश मिळवित जिल्हाधिकारी बनण्याचे स्वप्न साकार केले. त्यांचे आजोळ असलेल्या वाघळी गावी जल्लोषात स्वागत करून ग्रामस्थांनी घोड्यावरून मिरवणूक काढली. यात विद्यार्थ्यांनी लेझीम खेळले.

लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर डॉ.अर्जुन देवरे प्रथमच आपल्या घरी चाळीसगावी आले आहेत. शहरात विविध संस्था, संघटनांतर्फे त्यांचा सत्कार होत आहे. आजोळ असलेल्या वाघळी येथेही गुरुवारी सकाळी त्यांचा सत्कार झाला. या सत्काराने डॉ.अर्जुन देवरे यांचे वडील जयंत देवरे व आई डॉ.उज्‍जवला देवरे भारावल्या. डॉ.अर्जुन देवरे यांची ढोल-ताशांच्या गजरात घोड्यावर मिरवणूक काढण्यात आली. मान्यवरांनी त्यांच्या आजोबांच्या आठवणींना उजाळा करून दिला. व्यासपीठावर शशिकला सोनवणे, पोपट भोळे, डॉ. जयवंत देवरे, डॉ. उज्ज्वला देवरे, कैलास चौधरी, मुकुंद पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
डॉ. अर्जून देवरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, पुढील ध्येय गाठून अभ्यासाचे नियोजन करायला हवे. त्यामुळे यश हमखास मिळते. चांगल्या मित्रांचा सहवास असावा. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीसाठी इयत्ता तिसरीपासूनचा इतिहास व इतर विषय पुढे कामी पडत असतात. म्हणून अभ्यासाचे नियोजन व आवडीचा ध्यास असल्याचे त्यांनी सांगितले.