आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवविवाहितेने पतीच्या गुप्तांगावर वार करून लटकवले फासावर; धुळ्यात चौघांना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - केवळ तीन महिन्यांपूर्वी गळयात मंगळसूत्र घालणार्‍या पतीचा नवविवाहितेने इतरांच्या मदतीने खून केला. साक्री तालुक्यातील आमळी शिवारात घडलेला हा धक्कादायक प्रकार शवविच्छेदनानंतर उघडकीस आला आहे. याप्रकरणी नवविवाहितेसह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. तिच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे.

साक्री तालुक्यातील गरताड येथील सोम्या उर्फ सोमनाथ समारू गावित (22) याचा विवाह आमळी गावाजवळील तोरणकडी येथे राहाणार्‍या लक्ष्मीशी जून महिन्यात झाला होता. सासर्‍याकडे आला असताना आमळी गावाच्या शिवारात गळफास घेतलेल्या अवस्थेत सोम्याचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

सोमनाथच्या मृतदेहाचे काल सोमवारी धुळयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यासाठी सोमनाथचे वडील व मोठा भाऊ काही नातलगांसोबत धुळयात आले होते. सोम्याच्या गुप्तांगावर दुखापत करून त्याचा गळा घोटण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सोम्याचे वडील समारू दोधू गावित (52) यांच्या तक्रारीवरून सोम्याची पत्नी लक्ष्मी सोम्या गावित, सासरा साधू झिपरू बागुल, सासू निर्मला साधू बागुल, कांतिलाल साधू बागुल, मामेसासरा मकड्या बळीराम ठाकरे, काळू लोटू कोकणी यांच्याविरुद्ध भादंवि कलम 302,34 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.