आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सागर पार्कमधून अडीच लाखांचे उत्पन्न, सामाजिक उपक्रमांसाठी मिळते सवलत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरातील अनेक माेठ्या कार्यक्रमांचे साक्षीदार ठरलेल्या सागर पार्कच्या माध्यमातून पालिकेला दरवर्षी सुमारे दोन ते अडीच लाखांचे उत्पन्न मिळत असते. नुकतेच सागर पार्कवरील कार्यक्रमांसाठी पालिकेने शुल्कसंदर्भातील धाेरणही निश्चित केले अाहे. यात सामाजिक उपक्रमांसाठी माेठी सवलत देत पालिकेने समाजहिताला प्राधान्य दिले आहे. सागर पार्कची मालकी अाता पालिकेकडेच राहणार असल्याने या जागेच्या विकासाबाबत वेगवेगळे स्वप्न रंगवले जात अाहेत. 
 
शहरातील काही उच्चभ्रू वस्तींपैकी अाेंकारेश्वर मंदिर परिसर ओळखला जातो. या परिसरातील सागर पार्कचे महत्त्व हजाराेंच्या उपस्थित हाेणाऱ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून सतत अनुभवायला अाले अाहे. ३० ते ४० हजार जनसमुदायाला संबाेधित करायचे असेल तर काेणताही राजकीय पक्ष चटकन सागर पार्ककडे बाेट दाखवताे. 
 
न्यायालयीन लढा सुरू असतानाही या चार एकर जागेचा ताबा पालिकेकडेच हाेता. किरकाेळ वसुली विभागात अर्ज केल्यानंतर सागर पार्कवर कार्यक्रमाची परवानगी दिली जाते. यासंदर्भात काही महिन्यांपूर्वी महापालिकेच्या स्थायी समिती सभेत सागर पार्कवरील कार्यक्रमांचे वर्गीकरण करून त्याचे दर निश्चित करण्यात अाले अाहेत. 
बातम्या आणखी आहेत...