आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉवरलूममध्ये अडकून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू, कुटुंब आयपीएलची मॅच पाहण्यात हाेते दंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरातील तिरंगा चाैक परिसरात पाॅवरलूममध्ये अडकल्यामुळे आसिफ शेख नामक मुलाचा मृत्यू झाला. ही विचित्र दुर्दैवी घटना घडली त्या वेळी आसिफचे कुटुंबीय आयपीएलची मॅच पाहण्यात दंग होते. शिवाय लूमच्या आवाजामुळे आसिफचा आक्रोश कोणाच्याही कानावर गेला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 
 
शहरातील एेंशी फुटी रोडला लागून तिरंगा चौक आहे. या परिसरातील आसिफ जावेद शेख (१२) हा कुटुंबीयांसोबत राहतो. काल बुधवारी रात्री आसिफ हा अहमद शकील अहमद अकिल अली यांच्या पाॅवरलूम कारखान्यातील मशीनमध्ये अडकला. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. यानंतर आसिफला अत्यवस्थ अवस्थेत त्याचे कुटुंबीय, स्थानिक नगरसेवक अमीन पटेल, साजिद अन्सारी यांनी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले; परंतु उपचार सुरू करण्यापूर्वीच आसिफचा मृत्यू झाला होता. डॉ. अश्विनी भामरे यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी चाळीगाव रोड पोलिस ठाण्यात  अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर सकाळी शासकीय सोपस्कार पूर्ण केल्यानंतर आसिफचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. शोकाकुल वातावरणात त्याचा दफनविधी पार पडला. दरम्यान, आसिफ पॉवरलूमपर्यंत कसा पोहाेचला हा प्रश्न अनुत्तरित आहे. पोलिस ठाण्यात झालेल्या नोंदीत तो यंत्रात अडकल्याचे नमूद आहे; परंतु कारखान्यापर्यंत तो कसा पोहाेचला हे स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाॅवरलूम अासिफच्या घराच्या वरील मजल्यावर आहे. आसिफचे काका ते चालवतात. अासिफ त्यांना चहा देण्यासाठी गेला होता. या वेळी त्याचे काका खाली तळमजल्यावरील घरात टीव्हीवर आयपीएलची मॅच पाहण्यात गुंग होते. पॉवरलूममध्ये अडकून मृत्यू होण्याची ही शहरातील पहिलीच दुर्दैवी घटना आहे. यापूर्वी फार तर कामगारांना विजेचा धक्का लागण्याचे प्रकार घडले आहेत; परंतु आसिफच्या रूपाने विचित्र अपघाताचा प्रकार प्रथमच घडल्याची माहिती देण्यात आली. 

तर गुन्हा दाखल करू 
^आसिफच्या मृत्यू प्रकरणीनोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी चौकशीही सुरू आहे. या घटनेत कुणाचाही निष्काळजीपणा सिद्ध झाला तर त्याच्यावर कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाऊ शकतो; परंतु त्याबाबत आताच बोलणे सयुक्तिक ठरणार नाही. -हेमंतपाटील, पोलिस निरीक्षक 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...