आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अागाराला महिनाभरात २१ लाखांचा ताेटा, बसस्थानक नूतनीकरणाची निविदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव - नाेटबंदी तसेच टापरगाव येथील पुलाचे बांधकाम सुरू असल्याने चाळीसगाव अागाराला महिनाभरात २१ लाखांचा ताेटा सहन करावा लागला असल्याची माहिती अागारप्रमुखांनी दिली. अागाराला दरमहा काेटी ५० लाखांचे उत्पन्न मिळत असते.
अागाराच्या ८१ बसेस असून लांब पल्ल्याच्या स्वतंत्र १२ बसेस अाहेत. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी नाेव्हेंबर राेजी ५०० १००० रुपयाची नाेट बंदी केली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अागाराचे उत्पन्न ५० हजाराने घटले. त्यानंतर पुढचे २० दिवस बंद झालेले चलन वाहक स्वीकारत असले तरी असंख्य प्रवाशांनी चलन बदलून घ्यायचे असल्याने प्रवासाला जाण्यापेक्षा बँकेच्या रांगेत उभे राहणे पसंत केले. त्यामुळे ते १२ नाेव्हेंबर दरम्यान जवळपास दीड ते दाेेन लाखाचे उत्पन्न अागाराचे घटले. त्या काळात वास्तविक दिवाळीच्या शालेय सुट्ट्या सुरू हाेत्या, परंतु तारखेनंतर निश्चितपणे प्रवासी संख्या कमी झाली असल्याचे अागारप्रमु‌खांनी सांगितले. १४ नाेव्हेंबरपर्यंत लाखांचे उत्पन्न अागाराला अपेक्षित हाेते. ते थेट सहा लाखांवर अाले. त्यातच २३ नाेव्हेंबरपासून कन्नडच्या पुढील टापरगाव येथे पुलाचे काम सुरू झाल्याने चाळीसगाव-अाैरंगाबाद वाहतूक नांदगावमार्गे वळवण्यात अाली. त्यामुळेही प्रवासी घटले. ही दाेन्ही कारणे समाेर अाल्याने ४० दिवसांत २१ लाखांचे नुकसान अागाराचे झाले असल्याचे अागारप्रमुखांनी सांगितले.
दि.१० डिसेंबर राेजी ‘दिव्य मराठी’ ने प्रसिद्ध केलेले वृत्त. यापूर्वीदेखील ‘चाळीसगाव बसस्थानकाच्या...’ या शीर्षकाखाली ‘दिव्य मराठी’ ने पावसाळ्याअगाेदर वृत्त प्रसिद्ध करून पाठपुरावा केला हाेता.
फलाटाची उंची, शाैचालय, काँक्रीटीकरणाचे काम
मंजूर निधीतून बसस्थानकातील फलाटांची उंची वाढवण्यात येईल. तसेच शाैचालय दुरुस्ती, नवीन बेंचेस कांॅक्रिटीकरणाचे काम हाेईल. अनेक वर्षांपासून बसस्थानक समस्याग्रस्त हाेते. अामदार उन्मेश पाटील यांनी बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी उपाेषणाचा इशारा दिला हाेता. त्यांच्या अधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे निधी मंजूर हाेऊन उशिरा का हाेईना, निविदा मंजूर झाली. अाता प्रशासनाची झलक हवी.

ताेटा भरण्यासाठी अागाराचे उपाय असे
५००, १००० च्या नाेट बंदीचा फटका विवाह साेहळ्यांनाही बसला अाहे. त्यामुळे महिनाभरात मागील वर्षाच्या तुलनेने विवाहासाठी बसेस कमी बुक हाेत अाहेत. विवाह बसेस, पासधारक विद्यार्थी, सहलीच्या बसेस, नाताळनिमित्त असलेल्या १० दिवसांच्या सुट्ट्या अशा अनेक माध्यमातून पुढच्या काळात २१ लाखांचा ताेटा भरून काढण्याचे अाव्हान अागार व्यवस्थापनासमाेर अाहे. कारण पुढच्या काळात माेठा यात्राेत्सव नाही. इंग्रजी शाळांना १० दिवस सुट्ट्या असल्याने असंख्य प्रवासी बाहेरगावी जाण्याचा बेत अाखतील. म्हणून लांब पल्ल्याच्या अतिरिक्त बसेस साेडण्याचे नियाेजन हाेऊ शकते. डिसेंबरपर्यंत शाळा सहलीच्या १२ बसेस बुक अाहेत.

३० किलाेमीटर प्रवास, भाडेही ३० रुपये वाढ
चाळीसगाव-अाैरंगाबाद वाहतूक कन्नड घाटमार्गे जाता टापरगाव येथे पुलाचे काम सुरू असल्याने शिरूळ, देवगाव रंगारी, वेरूळ चाैफुलीमार्गे वळवण्यात अाली. त्यामुळे ३० किलाेमीटरचे अंतर प्रवासाचे वाढले. शिवाय प्रवाशांना ३० रुपये भाडेही वाढीव द्यावे लागत असल्याने अनेक प्रवासी मनमाडमार्गे रेल्वेने अाैरंगाबद प्रवास करतात. तर काहींनी खूप महत्त्वाचे काम असेल तरच अाैरंगाबाद प्रवास करायचे ठरवले आहे. त्याचा परिणाम एसटीच्या प्रवासी संख्येवर झाला. त्यामुळे २० दिवसांत सहा लाखांचा ताेटा चाळीसगाव अागाराला बसल्याचे सांगण्यात अाले आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या चाळीसगाव अागाराला सध्या अार्थिक संकटास सामाेरे जावे लागत अाहे. पुढच्या चार महिन्यांत काेणताही यात्राेत्सव नाही. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांना अद्याप चार महिने बाकी अाहेे. त्यामुळे २१ लाखांचा ताेटा भरून काढण्यासाठी अागार व्यवस्थापन वेगवेगळे प्रयाेग राबवत अाहे. २१ लाखांत जवळपास सात लाखांचा ताेटा टापरगाव पुलाचे काम सुरू असल्याने त्यामुळे वाहतूक मार्गात बदल केल्याने झाला असल्याचे अागार प्रमुख‌ांनी सांगितले. पुढच्या काळात लांब पल्ल्याच्या बसेस अधिक प्रमाणात सुरू करण्याचे अागाराने ठरवले अाहे. प्रवासी वाहकात सुट्या पैशांसाठी वाद थांबलेले नाही. त्यामुळे काही प्रवासी प्रवास करणेच टाळत अाहेत.
चाळीसगाव - जिल्ह्यात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या चाळीसगाव अागाराची अवस्था गेल्या ते १० वर्षांपासून अतिशय वाईट अाहे. अागाराच्या नूतनीकरणासाठी ९१ लाख रुपयांचा निधी मंजूर हाेता. परंतु, कामाला मुहूर्त मिळत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी हाेती. ‘दिव्य मराठी’ ने या संदर्भात दाेनदा वृत्त प्रसिद्ध केले. चार दिवसांपूर्वीच ‘चाळीसगाव बसस्थानकाच्या नूतनीकरणाला मुहूर्त तरी कधी?’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध झाले हाेते. या वृत्ताची दखल परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली.
९१ लाखांची निविदा दाेन दिवसांपूर्वीच मंजूर झाली. राज्यातील २० बसस्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामाची निविदा नुकतीच नि‌घाली. तर मग चाळीसगाव बसस्थानकाचे काम मंजूर असताना कामाचे घाेडे अडले कुठे? असा प्रश्न उपस्थित हाेत हाेता. उशिरा का हाेईना, निविदा निघाली. त्यामुळे बसस्थानकाच्या नूतनीकरणाचा प्रश्न किमान मार्गी लागला अाहे. परंतु, तरीदेखील यदंाच्या पावसाळ्यापर्यंत काम सुरू हाेऊन पूर्ण हाेण्याची अाशा धुसरच अाहेे. अर्थात एस.टी.महामंडळाचा थंड कारभारच त्यास कारणीभूत ठरू शकताे. काम सुरू हाेण्यापर्यंत अनेक प्रक्रिया असेल.
बातम्या आणखी आहेत...