आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेहाडी हाणामारी; 40 जणांवर गुन्हा, दाेन्ही गटांची परस्परविराेधी तक्रार; सहा जण जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुचाकीचे झालेले नुकसान. - Divya Marathi
दुचाकीचे झालेले नुकसान.
धुळे - येथील माेहाडी उपनगरात पूर्ववैमनस्यातून दाेन गटात हाणामारी झाली. त्यात दाेन्ही गटातील सहा जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी दाेन्ही गटांकडून परस्परविराेधी तक्रार देण्यात आली आहे. त्यावरून दाेन्ही गटातील ४०पेक्षा अधिक जणांविरुद्ध लूट, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. या प्रकरणी विनायक वालचंद शिंदे यांनी पाेलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले अाहे की, विक्की उर्फ विकास गावडे, सुनील गावडे, संदीप एकनाथ गावडे, राहुल विठ्ठल गावडे, पप्पू ज्ञानेश्वर गावडे, नाना गावडे, बावन पिंट्या, विठ्ठल गावडे आदींनी ११ मार्च राेजी सायंकाळी तिखी राेडवरील पंजाबी काॅलनीजवळ असलेल्या मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो, त्या वेळी शिवीगाळ करीत राजकारण करताे; असे सांगून लाेखंडी राॅडने मारण्याचा प्रयत्न केला. या वेळी भांडण साेडवण्यासाठी अालेला भाऊ राजेंद्र शिंदे यालाही मारहाण केली. या वेळी खिशातील दाेन हजार रुपये काढून घेण्यात आले. तसेच सहकार्य करणारे सूर्यभान संभाजी पाटील, छायाबाई सूर्यभान पाटील हे जखमी झाले.
 
त्याचबरोबर याेगेश भास्कर पाटील यांच्या घरावर दगडफेक करण्यासह देवगावकर यांच्या मालकीच्या दुचाकीचे नुकसान केले. यात अापल्यासह राजेंद्र वालचंद्र शिंदे हे जखमी झाल्याचे तक्रारीत म्हटले अाहे. दुसऱ्या गटाकडून सुनील भानुदास गावडे यांनी तक्रार दिली अाहे. त्यात म्हटले अाहे की, राजेंद्र वालचंद्र शिंदे, किशाेर पाटील, वाल्मीक पाटील, श्याम पाटील, सुरेश नारायण पाटील, अभिजित पाटील, मुन्ना (पूर्ण नाव नाही), विनायक वालचंद शिंदे, जीवन देविदास पाटील, अशाेक नारायण पाटील, भूषण सुरेश पाटील, चेतन अशाेक पाटील, बाळा रवींद्र पाटील, अाकाश विनायक शिदे, दादू सूर्यभान ठाकूर, बंटी सूर्यभान ठाकरे, सागर अानंदा पाटील, ज्ञानेश्वर भगवान पाटील, याेगेश भास्कर पाटील, किशाेर पाटील, भटू पाटील, राकेश रमेश भामरे, साेन्या सुरेश शिंदे, रवींद्र नारायण शिंदे, काळ्या उर्फ प्रदीप शिंदे, शेखर विनायक शिंदे, सागर बंडू पाटील, सखाराम भगवान पाटील, विजय रामचंद्र अहिरे यांनी शनिवारी (दि.११) सायंकाळी साडेपाच वाजता श्रीराम रिक्षा स्टाॅपजवळ राजकीय वैमनस्यातून मारहाण केली. मारहाण करणारे जिप्सी (क्र.५५५) लाल रंगाच्या बाेलेराेवर (क्र.एमएच १८-३६९) आले होते. त्यांनी तुम्हाला गावात राहू देणार नाही असे सांगत शिवीगाळ करून हत्याराने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले अाहे. मारहाणीत सुनील गावडे, विक्की गावडे, प्रदीप रमेश गावडे, भूषण ज्ञानेश्वर पाटील हे जखमी झाले. 
 
या कलमानुसार गुन्हे 
माेहाडी पाेलिस ठाण्यात दाेन्ही गटातील सदस्यांविरुद्ध भादंवि कलम ३०७,३९५, १४३, १४७, १४९, ३२४, ३२६, ३३६, ३३७, ३४२, ४२७, ३२३, ५०४, ५०६, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. तपास माेहाडीचे सहायक पाेलिस निरीक्षक जयंत शिरसाठ करीत अाहेत. या प्रकरणी अद्याप काेणालाही अटक झाली नाही. गावात दुसऱ्या दिवशीही पाेलिस बंदाेबस्त कायम हाेता. 
बातम्या आणखी आहेत...