आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळमध्ये 5 तास कोम्बिंग; 4 संशयित अटकेत, गुरांचा ट्रक पकडला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कारवाई दरम्यान पोलिसांनी जप्त केलेला ट्रक. - Divya Marathi
कारवाई दरम्यान पोलिसांनी जप्त केलेला ट्रक.
भुसावळ  - सहायक पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या सूचनेवरून शनिवारी रात्री ११ ते रविवारी पहाटे ४ या पाच तासात पोलिसांनी शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवले. या मोहीमेत तीन ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. कारवाईत तलवार घेऊन फिरणाऱ्या हद्दपारीसह अन्य तीन जणांना अटक करण्यात आले. तसेच नाकाबंदीदरम्यान गुरांची अवैध वाहतूक करणारा ट्रकदेखील पोलिसांनी पकडला. 
 
शहर पाेलिस ठाण्याचे निरीक्षक वसंत माेरे, बाजारपेठ पाेलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत सराेदे यांनी शनिवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन केले. तसेच नाहाटा चौफुली, अष्टभुजा देवी आणि महात्मा गांधी पुतळ्याजवळ नाकाबंदी करण्यात आली. या मोहीमेदरम्यान दीनदयाल नगरात पहाटे २.३० वाजेच्या सुमारास दीपक राजू पवार (वय २२, रा. इंद्रनगर, भुसावळ) हा पाेलिसांना पाहून लपला. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली. त्याच्याकडे पेंचीस एक स्क्रूड्रायव्हर असे साहित्य सापडले. चोरीच्या उद्देशाने तो पहाटे फिरत होता. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक करून गुन्हा दाखल केला. कारवाईच्या मोहीमेमुळे उपद्रवींचे धाबे दणाणले आहे. 
 
गुरांची अवैध वाहतूक रोखली 
नाकाबंदीच्या काळात नाहाटा चाैफुलीजवळ वाहनांची तपासणी सुरू असताना अायशरद्वारे (क्र.एम.पी.१२.जी.ए.०७३३) गाडीत गुरे कोंबल्याचे आढळले. ट्रकमध्ये १४ म्हशी १० पारडू अशी २४ गुरे दाटून कोंबली होती. पाेलिसांनी तत्काळ सर्व गुरांना जळगाव येथील पांझरपोळमध्ये रवाना केले. एका म्हशीचा मृत्यू झाला. वाहनचालक वसीम खान सलीम खान (रा. खंडवा) अबूजर उस्मान गती (वय ३५ रा. हिरापूर, मालेगाव) यांना अटक झाली. तसेच अायशर जप्त केली. खंडव्याहून औरंगाबादला गुरांची वाहतूक केली जात होती. 
 
श्रद्धानगरातून तलवार जप्त 
हद्दपार सचिन ज्ञानदेव भगत (वय २८) श्रद्धानगरात आल्याची गुप्त माहिती पाेलिस निरीक्षक चंद्रकांत सराेदे यांना मिळाली होती. त्यामुळे सहायक पाेलिस निरीक्षक मनाेज पवार, हवालदार निशिकांत जाेशी, माणिक सपकाळे, दीपक जाधव यांनी श्रद्धानगर गाठले. हद्दपार सचिन भगत त्या भागात तलवार घेऊन फिरताना आढळला. पाेलिसांनी त्याला रात्री २.३० वाजेच्या सुमारास २२ इंच लांबीच्या तलवारीसह ताब्यात घेतले. पोलिस कर्मचारी दीपक जाधव यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पाेलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. 
 
वरिष्ठांच्या सूचना 
अचानक नाकाबंदी आणि काेम्बिंग अाॅपरेशन करण्याची सूचना वरिष्ठ पातळीवरून मिळाल्याने पहाटेपर्यंत प्रक्रिया सुरू हाेती. भविष्यातही अचानक अाॅल अाऊट माेहीम पाेलिसांकडून राबवली जाणार अाहे, असे सहायक पाेलिस अधीक्षक नीलाेत्पल यांनी “दिव्य मराठी’सोबत बोलताना सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...