आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक: जामनेरात दाेन महिन्यांपासून 50 हजार लिटर रॉकेल पडून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामनेर - आधारकार्डची झेरॉक्स जमा केल्याशिवाय ग्राहकास रॉकेल वितरित करू नये, अशी सक्त ताकीद प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. मात्र, आधार कार्ड घेतल्यास रॉकेल वितरणातील घोटाळ्याचे बिंग फुटण्याची भीती असल्याने जामनेर तालुक्यातील वितरकांचा गेल्या दोन महिन्यांपासून ५० हजार लिटर रॉकेल काेटा पडून असल्याचा प्रकार समाेर आला आहे. 
अनुदानातील घोटाळा रोखण्यासाठी शासनाने पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. अनुदान एजन्सी किंवा वितरकाच्या खात्यात देता ते थेट ग्राहकाच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात गॅस कनेक्शनधारकांचे आधार लिंकिंग करून बँक अकाऊंट नंबर घेण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे तालुक्यातील रॉकेल वितरकांचेही आधार लिंकिंग करून त्यांच्याही आधार कार्डच्या झेरॉक्स बँक अकाऊंट नंबर घेण्याच्या सूचना शासनाच्या आदेशानुसार प्रभारी तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी रॉकेल वितरकांना दिल्या होत्या. यानुसार तालुक्यातील ३२ हजार ग्राहकांपैकी हजार ५७१ ग्राहकांचेच लिंकिंग झालेले आहे. रॉकेल वितरित करताना प्रत्येकाकडून आधार कार्डची झेरॉक्स त्यांचा बँक अकाऊंट नंबर घेतल्याशिवाय रॉकेल देऊ नये, अशी सक्त ताकीद प्रभारी तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी दिली. मात्र, त्यानंतरही वितरकांकडून प्रतिसाद दिल्याने नोव्हेंबर महिन्यापासून रॉकेलचा कोटा घटवून ३० टक्केच मागणी करण्यात आली. ३० टक्क्यांनुसार नोव्हेंबरचे ३६ हजार डिसेंबर महिन्याचे २४ हजार लिटर रॉकेल मागवण्यात आले आहे. 

मात्र, आधार कार्डची सक्ती केलेली असल्याने वितरकांनी गेल्या दोन महिन्यांपासून रॉकेलचे वितरणच केलेले नाही. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून अर्धघाऊक वितरकांकडे ७२ हजार लिटर रॉकेल मागवण्यात आले होते. की जवळपास ५० हजार लिटर रॉकेल आजही पडून आहे. दरम्यान, प्रशासनाने विरकांनी अटी-शर्तींची पूर्तता करणे बंधनकारक असल्याचे नमूद केले अाहे. त्यामुळे वितरक या संदर्भात पूर्तता कधी करुन राॅकेलचे वितरण सुरू करतात? याकडे जामनेर शहरासह तालुक्यातील ग्राहकांचे लक्ष लागले अाहे. 

कोटा कमी झाला म्हणून तालुक्यातील किरकोळ वितरकांनी रॉकेलची उचल केली नाही. तर कोटा कमी झाला म्हणून प्रभारी तहसीलदार कासुळे यांना निवेदन दिले. वेळ पडल्यास शासनाच्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याचीही भाषा केली. कोटा कमी झाल्याने वितरकांनी अाकांड-तांडव केले असले तरी तालुक्यातील ग्राहकांची मात्र, ओरड नाही. यावरून अपवाद वगळता बहुतांश ग्राहकांना रॉकेलच मिळत नसल्याचे सिद्ध होते. आता अनुदान थेट ग्राहकाच्या खात्यात जमा करण्याच्या हालचाली गतिमान झाल्याने आधार कार्डची झेरॉक्स बँक अकाऊंट नंबर घेण्यास वितरक टाळाळाळ करीत असल्याची शंका प्रशासनाकडून व्यक्त होत अाहे. 

अटी-शर्तींची पूर्तता गरजेची 
- ७० टक्केग्राहकांचे लिंकिंग झाले असले तरी आधारची झेरॉक्स बँक अकाऊंट नंबर मिळालेले नाहीत. त्यामुळे रॉकेलच्या कोट्यात कपात केली आहे. तालुक्याच्या काही भागात अटी-शर्तींची पूर्तता केलेल्या ग्राहकांना १४ हजार लिटर रॉकेल वितरित करण्यात आले आहे. जोपर्यंत अटींची पूर्तता होत नाही, तोपर्यंत ग्राहकास रॉकेलचे वितरण करू नये, अशी ताकीद देण्यात अालेली आहे. परमेश्वरकासुळे, प्रभारी तहसीलदार, जामनेर 
बातम्या आणखी आहेत...