आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालिका, महावितरण, बीएसएनएलची एका दिवसात अडीच काेटींची कमाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातील नागरिकांनी गेल्या १६ दिवसांपासून महापालिका मालमत्ता कराच्या भरणा करण्यासाठी गर्दी केली अाहे. ५०० १००० रुपयांच्या नाेटा बदलाच्या निमित्ताने नागरिकांनी चारही प्रभाग समितींमध्ये चांगला प्रतिसाद दिल्याने साडेअकरा कोटींचा भरणा या १६ दिवसांत झाला अाहे. पालिकेच्या तिजोरीत जमा झालेल्या कराच्या रकमेतून कोणती कामे करण्यात येतील, याबाबत नागरिकांकडून विचारणा केली जात अाहे. यासंदर्भात अायुक्त जीवन सोनवणेंनी अापली भूमिका जाहीर केली अाहे. या जमा हाेणाऱ्या कराच्या रकमेतून शहरातील रस्त्यांची पॅचवर्कद्वारे दुरुस्ती करण्यात येणार अाहे. तसेच शहराला दररोज पाणीपुरवठा हाेण्यासाठी हाती घेतलेल्या अमृत योजनेचा स्व हिस्सा भरण्यात येणार अाहे. कचरा संकलनासाठी प्रत्येक वाॅर्डाला स्वतंत्र घंटागाडी कचरा वाहून देण्यात येणार अाहेत. शहरातील सर्व पथदिवे दुरुस्त करण्यात येतील. तसेच शहर हागणदारीमुक्त हाेण्यासाठी सार्वजनिक शौचालये सुस्थितीत ठेवण्यासाठी हा पैसा खर्च करण्यात येणार असल्याचे अायुक्तांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केले अाहे. अायुक्तांच्या या निर्णयामुळे जळगावकरांना सुखद धक्का बसला अाहे.
प्रतिनिधी | जळगाव
१००० ५०० रुपयांच्या जुना नाेटा चलनातून बंद केल्यानंतर या नाेटांच्या अाधारावर फक्त शासकीय भरणा केला जात अाहे. गुरुवारी जुन्या नाेटांवर भरणा करण्यासाठी अंतिम मुदत असल्याने नागरिकांनी शासकीय कार्यालयांत कर बिले भरण्यासाठी ताेबा गर्दी केली हाेती. त्यामुळे गुरुवारी महावितरणमध्ये काेटी ५० लाख, बीएसएनएलमध्ये १५ लाख तर मनपात रात्री १२ वाजेपर्यंत कोटी लाख असा एकूण काेटी ६९ लाखांचा कर थकित बिलापाेटी भरणा झाला. तर १६ दिवसांत मनपा, महावितरण, बीएसएनएलची ४८ काेटी २१ लाखांची कमाई झाली असल्याने या कार्यालयांना खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिन’ अाले अाहेत. दरम्यान, सरकारने संध्याकाळी फक्त ५०० रूपयांच्या जुन्या नाेटांवर १५ डिसेंबरपर्यंत कर भरण्यास मुदत वाढ दिल्याने नागरिकांना दिलास मिळाला अाहे.

महापालिकेत मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी ५०० १०००च्या नाेटा स्वीकारण्यासाठी शेवटचा दिवस असल्याचे समजून गुरुवारी रात्री १२ वाजेपर्यंत बहुसंख्य नागरिकांनी हजेरी लावली. दिवसभरात ९५ लाखांचा भरणा झाला अाहे.
भरण्याचीरक्कम तब्बल १२ काेटी १६ लाखांवर पाेहोचली अाहे. बुधवारी सायंकाळपर्यंत ११ काेटी २१ लाखांचा भरणा झाला हाेता. तर गेल्या १६ दिवसांतील भरणा १२ काेटी १६ लाख रुपयांवर पाेहोचला अाहे. महावितरण कंपनीत गुरुवारी काेटी ५० लाख, तर १६ दिवसांत ३५ कोटी वसुली झाल्याचे जनसंपर्क विभागाने सांगितले. बीएसएनएलने गुुरुवारी दिवसभरात १५ लाख तर १६ दिवसांत कोटी लाख रुपयांचा भरणा झाला अाहे.
एटीएमवरअजूनही मिळतेय दोन हजाराचीच नोट
नोटबंदीच्या निर्णयानंतर शहरवासीयांची विस्कटलेली आर्थिक घडी आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. गुरुवारी स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतील एटीएम बंद होते. तर काही बँकांचे एटीएम अपग्रेड झाल्याने फक्त दोन हजारांच्याच नोटा मिळाल्या. त्यामुळे ग्राहकांचा हिरमोड झाला. एका ग्राहकास एकावेळेस फक्त दोन हजार रुपये काढता येत होते; मात्र ते ही दोन हजारांच्या नोटच्या स्वरूपात. ही नोट हातात पडल्यानंतर मात्र या नोटच्या सुट्याची चिंता ग्राहकांना सतावत होती. परिणामी एटीएमवरील गर्दी बऱ्यापैकी ओसरल्याचे दिसून आले.

सीडीएमसमोरीलगर्दीही घटली
बँकांनीपैसेे भरण्यासाठी ग्राहकांना सीडीएमची सुविधा उपलब्ध करून दिली अाहे. गेल्या काही दिवसांपासून येथे दिसणारी गर्दी गुरुवारी झालेली दिसली. तसेच एक्स्चेंज काउंटरवरही नागरिकांच्या बोटाला शाई लावली जात असल्याने त्यावरील गर्दीदेखील कमी झाली आहे. त्याचबराेबर बँकेचे व्यवहारदेखील सुरळीत व्हायला सुरुवात झाली आहे. आयडीबीआय, एस.बी.आय, कार्पोरेशन, बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांचे सर्व एटीएम सुरू झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला अाहे. त्यामुळे बँकांवरचा ताण कमी झाला आहे.

येत्या तीन दिवसांत येणार नाेटा
एटीएमवरसध्या दोन हजार आणि शंभराच्या नोटा मिळत आहेत. मात्र, अजूनही पाचशेच्या नोटा जळगावात उपलब्ध झाल्या नाहीत. येत्या तीन दिवसांत या नोटा येण्याची शक्यता आहे. तसेच शहरातील अनेक एटीएममध्ये नव्या दोन हजारांच्या नोटा ठेवण्यासाठी बीन बसवण्यात आली असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

शहरातील बँका, एटीएमबाहेरील गर्दी अाेसरली
नाेटबंदीनंतर धनादेश अाणि अाॅनलाइन व्यवहारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बँकांसाेबतच एटीएमबाहेरील गर्दीदेखील कमी झाली अाहे. खरेदीदेखील स्वॅपिंग मशीनद्वारे हाेत असल्याने नागरिकांची पैशांची समस्या काही अंशी कमी झालेली दिसत अाहे.
बातम्या आणखी आहेत...