आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाटा साेशल सायन्सेस करणार अाश्रमशाळांची कसून तपासणी, समिती असेल कार्यरत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या अखत्यारित चालणाऱ्या आश्रमशाळांपैकी वर्गातील शासकीय अनुदानित आश्रमशाळांच्या पुनर्तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी महिला बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त त्रयस्थ समितीकडून पाहणी केली जाईल. या समितीत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या प्रतिनिधींचाही समावेश असून, या समितीच्या अहवालावरच या शाळांचे भवितव्य अवलंबून राहील.

आदिवासी आश्रमशाळांवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात येत असतानाही आदिवासी विद्यार्थ्यांना पुरेशा सोयी-सुविधा मिळत नसल्याचे वास्तव आहे. आश्रमशाळांना पुरेसे पाणी, स्वच्छ पौष्टिक अन्न, स्वच्छतागृहे इतर मूलभूत सुविधा पुरेशा नाहीत अशा आश्रमशाळांची टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेतर्फे तपासणी करण्यात आली. या तपासणी अहवालाच्या अनुषंगाने दर्जाच्या आश्रमशाळांच्या पुनर्तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी महिला बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अखत्यारित नियुक्त स्वतंत्र समितीच्या माध्यमातून ही चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीसाठी शासनाने कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला असून, उद्या गुरुवारपासून चौकशीला सुरुवात होणार अाहे. त्यात पहिल्या टप्प्यात तालुकानिहाय चौकशी समिती गठीत करण्यात येणार आहे. १५ जानेवारीपर्यंत चौकशी पूर्ण करून उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे समित्या अहवाल सादर करणार आहेत. तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा अहवाल २० जानेवारी रोजी आदिवासी विकास अायुक्तांना सादर करणार आहेत. समितीत महिला बालविकास अधिकाऱ्यांबरोबरच शिक्षण विस्तार अधिकारी, समाजकल्याण निरीक्षक, स्थानिक बचत गटातील नामनिर्देशित सदस्य, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस संस्थेच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. ज्या शाळांमध्ये मूलभूत सुविधा नसतील किंवा शाळेचा दर्जा सुमार असेल अशा शाळा बंद करण्यात येणार आहेत. तसेच या शाळेतील विद्यार्थी अन्यत्र कोठे समायोजित करावेत यासंदर्भात अहवालही समितीनेच द्यावयाचा आहे. शाळांना समितीने अकस्मात भेट द्यावयाची आहे. यासंदर्भात शाळा व्यवस्थापनाला पूर्वसूचना देता अचानकपणे भेट देऊन पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अत्यंत गोपनीय पद्धतीने त्रयस्थ समितीकडून पाहणी करणार असल्याने अहवालावरच शाळांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

त्रयस्थ समितीतर्फेच पाहणी

-आदिवासी विकासविभागाच्या माध्यमातून चालणाऱ्या दर्जाच्या आश्रमशाळांची पुनर्तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी त्रयस्थ समिती नियुक्त करण्यात आली असून, ही समिती पाहणी करणार आहे.
-बाळासाहेबजैन, प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास विभाग

पथकांची होईल नियुक्ती
-शासनाच्याआदेशानुसारतपासणीची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भात पत्र मिळाले असून, तपासणी पथकांची नियुक्ती करून कालबद्ध कार्यक्रमात तपासणी करण्यात येणार आहे.
-आर.एस. तडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे

हे आहेत प्रश्न
तपासणी दरम्यान पाठ्यपुस्तके, लेखन सामग्री आवश्यकतेनुसार मिळाली अाहे का, स्नानगृह, शौचालयांचा वापर होतो का, वसतिगृहात सुविधा कशा आहेत, जेवण नाष्ट्याचा दर्जा पुरेसा मिळतो का, मेनू कार्डनुसार जेवण मिळते का, भोजनगृह स्वयंपाकगृहाची व्यवस्था, नियमित पुरेसा पाणीपुरवठा होतो का आदी मुद्द्याची पडताळणी करण्यात येणार अाहे.

आदिवासी पट्ट्यातील शाळांचा तपासणीत असेल समावेश
जिल्ह्यात दर्जाच्या आश्रमशाळांमध्ये पाच आश्रमशाळांचा समावेश आहे. त्यात कोडीद, हिरवखेडा, उमरदा, चरणमाळ, सुकापूर या आश्रमशाळांचा समावेश आहे. या पाच आश्रमशाळांची समितीकडून तपासणी करण्यात येणार आहे.

या मुद्द्यांवर आहे भर
पूर्वसूचना देता समितीकडून पाहणी करण्यात येणार आहे. तपासणीत वर्गखोल्या, वसतिगृह, स्वयंपाकगृह, भोजनगृह, कोठीगृह, शाैचालय, स्नानगृहे, पाणी व्यवस्था पाहण्यात येणार आहे. समिती सदस्यांकडून विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. या चर्चेवेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, व्यवस्थापक यांचे प्रतिनिधी येथे थांबणार नाहीत याची खबरदारी घेण्यात येईल.
बातम्या आणखी आहेत...