आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेवारस बॅगमध्ये निघाला गावठी दारूने भरलेले ट्रकचे ट्यूब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 जळगाव - दांडेकर नगर परिसरातील इंद्रप्रस्थनगरात गुरुवारी पहाटे वाजेपासून रस्त्याच्या कडेला एक माेठ्या अाकाराची बेवारस बॅग अाढळल्याने खळबळ उडाली हाेती. याविषयी सकाळी ९.४५ वाजता नागरिकांनी पाेलिस नियंत्रण कक्षाला फाेन केल्यानंतर सकाळी १०.१५ वाजता पाेलिसांचे बाॅम्बशाेधक नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले.
 
या वेळी बीडीडीएसच्या पथकाने यंत्राद्वारे श्वानाच्या मदतीने तपासणी केली. मात्र, त्यात संशयास्पद काहीच अाढळल्याने पथकाने बॅग शहर पाेलिस ठाण्यात अाणली. बॅगमध्ये गावठी दारूने भरलेला ट्रकचा ट्यूब निघाला. 

इंद्रप्रस्थनगरातील अॅड. दिलीप पाेकळे अाणि राम जडेजा यांच्या घरासमाेर रस्त्याच्या कडेला गुरुवारी पहाटे वाजेपासून एक बेवारस बॅग पडलेली हाेती. सुरुवातीला बॅगकडे काेणीही लक्ष दिले नाही. सकाळी ९.३० वाजेपर्यंत बॅग घेण्यासाठी काेणीच अाले नाही. त्यामुळे अॅड. पाेकळे अाणि जडेजा यांनी पाेलिस नियंत्रण कक्षाला फाेन करून बेवारस बॅगविषयी माहिती दिली.
 
नियंत्रण कक्षाला मिळालेल्या माहितीवरून त्यांनी बाॅम्बशाेधक अाणि नाशक पथकाला सूचना दिली. त्यानंतर बीडीडीएस पथकाचे सहायक पाेलिस उपनिरीक्षक अरुण पाटील, राजेंद्र जंगले, नंदलाल चाैधरी, देवानंद साळुंखे, विनाेद सूर्यवंशी, राजेंद्र पाटील, अतुल चाैधरी हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सकाळी १०.२० ते १०.४५ वाजेपर्यंत स्फाेटके शाेधक यंत्राने बॅगची तपासणी केली. त्यानंतर श्वान सनी याने तपासणी केली.
 
यात ५० लिटरच्या जवळपास गावठी दारू भरलेला ट्रकचा ट्यूब सापडला. तो ट्यूब शहर पाेलिसांच्या ताब्यात दिला. दरम्यान, बुधवारी रात्री पाेलिसांची गस्त सुरू असल्याचे पाहून गावठी दारूची वाहतूक करणाऱ्याने बॅग फेकून पाेबारा केल्याचा पाेलिसांचा अंदाज आहे. 
बातम्या आणखी आहेत...