आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून फेकल्या फायली; कारवाईसाठी कर्मचाऱ्यांंनी मांडला ठिय्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महापालिकेत लोकशाही दिनात अधिकाऱ्यांशी वाद घालताना अनिल नाटेकर, शिवराम पाटील. - Divya Marathi
महापालिकेत लोकशाही दिनात अधिकाऱ्यांशी वाद घालताना अनिल नाटेकर, शिवराम पाटील.
जळगाव - महापालिकेत साेमवारी सकाळी लाेकशाही दिनात जागृती मंचच्या दाेघांनी तक्रार दाखल करून घेण्याच्या मुद्यावरून मनपा अधिकाऱ्यांना शिवागाळ केली. एवढेच नव्हे तर टेबलावरील साहित्याची फेकाफेक केल्याने प्रचंड गाेंधळ उडाला. या प्रकारामुळे संतापलेल्या मनपा कर्मचाऱ्याने घटनेचा निषेध करीत कामबंद अांदाेलन केले. तसेच शहर पाेलिस ठाण्यात दीड तास ठिय्या मांडून दाेघांवर गुन्हा दाखल करण्याची जाेरदार मागणी केली. त्यानंतर पाेलिसांनी दाेघांवर गुन्हा दाखल केल्यानंतर कर्मचारी पोलिस ठाण्यातून बाहेर पडले. नवीन वर्षात कामकाजाच्या पहिल्याच दिवशी वाद झाल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. 
महापालिकेत साेमवारी दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यात नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी पालिकेच्या आयुक्त जीवन सोनवणे, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी, काही कर्मचारी उपस्थित होते. सकाळी १०.४५ वाजता जळगाव जागृत मंचचे शिवराम पाटील अनिल नाटेकर हे तक्रार दाखल करण्यासाठी आले. त्यांनी सभागृहाच्या बाहेर असलेल्या नोंदणी टेबलावर अर्ज दिला. मनपा कर्मचारी, अधिकारी कर्तव्यात कसूर करून भ्रष्टाचार करतात. तसेच शाहूनगर, तांबापुरा शौचालयांच्या कामात झालेल्या भ्रष्टाचारांची माहिती देणारा हा अर्ज होता. लोकशाही दिनात केवळ वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी स्वीकारल्या जातात.
 
२९ दिवसांत दुसरी घटना 
गेल्यामहिन्यात नाटेकर हे आपल्या सेवानिवृत्तीचे लाभ मिळाल्यामुळे पालिकेसमोर सपत्नीक उपोषणाला बसले होते. डिसेंबरच्या महासभेत त्यांचे निवेदन घेऊन त्यांची पत्नी मीना नाटेकर शिवराम पाटील बेकायदेशीरपणे सभागृहात शिरले होते. सभा सुरू असतानाच त्यांनी गोंधळ घालत महापौर, आयुक्तांच्या अंगावर निवेदन फेकले होते. त्यानंतर अात ही घटना घडली. 
 
शिवीगाळ अन् दप्तर फेकले 
 - 
लोकशाहीदिनाशिवायही इतर दिवशी ते या वेळेत नागरिक पालिकेशी संबंधित कोणतीही तक्रार माझ्याकडे करू शकतात. नाटेकर पाटील यांनी केलेली तक्रार बेकायदेशीर आहे. शिवाय त्यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणे, दप्तर फेकणे कायद्याला धरून नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आमची पोलिसांकडे मागणी आहे.
- जीवन सोनवणे, आयुक्त प्रशासनाची भू्मिका योग्य 
 
- आपली तक्रारमांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु लोकशाही पद्धतीने तक्रार मांडली पाहिजे. नाटेकर हे पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारे अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणे याेग्य नाही. प्रशासनाने घेतलेली भूमिका योग्य आहे.
-नितीन लढ्ढा, महापौर नाटेकर, पाटील सिव्हिलमध्ये दाखल 
 
शहरपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवराम पाटील अनिल नाटेकर यांना अटक करण्यात आली. वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले होते. रुग्णालयात गेल्यानंतर लागलीच प्रकृती बिघडल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याजवळ पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

मारहाण केल्याचा आरोप 
पोलिसठाण्यात आणल्यानंतर नाटेकर पाटील यांनीदेखील एक अर्ज पोलिसांना दिला आहे. लोकशाही दिनात तक्रार करण्यासाठी गेलो असता पालिकेचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी मारहाण केली, असे या अर्जात म्हटले आहे. हा अर्ज पोलिसांनी दाखल करून घेतला आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...