आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे पुतळादहन, धमकी देणाऱ्याचे नाव जाहीर करण्याची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - दिल्ली विद्यापीठाच्या आवारात देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप असलेल्या उमर खालिद याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे गुरुवारी शहरात दहन करण्यात आले. सैन्य दलातील शहीद अधिकाऱ्याच्या मुलीला धमकी देणाऱ्याचे नाव जाहीर करावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. 
 
उमर खालिदने काही दिवसापूर्वी दिल्ली विद्यापीठात देशविरोधात घोषणाबाजी केली होती, असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे. तसेच शहीद जवानाच्या मुलीला बलात्काराची धमकी दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे गुरुवारी जयहिंद महाविद्यालयासमोर आंदोलन करण्यात अाले.
 
 तसेच उमर खालिदच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. याशिवाय शहीद जवानाच्या मुलीला धमक्या देणाऱ्याचे नाव जाहीर करावे. तसेच त्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या वेळी शहर मंत्री महेश निकम, महाविद्यालय प्रमुख राहुल साठे, योगेश थोरात, नेहाल परदेशी, प्रियंका निकम, प्रिया नेरकर, पूजा गुरव, आकांक्षा भोसले आदी उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...