आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रक एसटीवर धडकला; तीन ज‌खमी, अपघातामुळे महामार्गावर सुमारे दीड तास वाहतुकीची कोंडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अाेव्हरटेक करण्याच्या नादात ट्रकने समाेरून येणाऱ्या एसटी बसला जाेरदार धडक दिली. यात ट्रक एसटी या दोघांच्या केबिनचा चक्काचूर झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले अाहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी वाजता महामार्गावरील अाकाशवाणी ते इच्छा देवी चाैकादरम्यान घडली.  
 
आकाशवाणी इच्छादेवी चौकाच्या मधोमध महामार्गावर एसटी बस ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. यात तिघे जखमी झाले. शुक्रवारी सकाळी वाजता हा अपघात झाला. 
खिरोदा-जळगाव ही बस (क्रमांक एमएच- २०, बीएल- ०९३२) शुक्रवारी सकाळी वाजता जळगावात दाखल झाली. आकाशवाणी {इच्छादेवी चौकादरम्यान समोरून ओव्हरटेक करीत येत असलेल्या ट्रक (क्रमांक एमएच- १९, झेड- ५३५६)ने एसटीला जाेरदार धडक दिली. यात ट्रकचालक आदील खान नवाज खान (रा. समतानगर), बसचालक भागवत पद्माकर लोहार वाहक तेजसिंग ठाणसिंग राजपूत (दोघे रा. यावल) हे तिघे जखमी झाले. त्याना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या शिवाय एसटीमधील तीन ते चार प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात अाला. अपघातात बसचा चालकाकडील पत्रा मोठ्या प्रमाणात दबला गेला असून पुढील रांगेतील चार सीट चक्काचूर झाले आहेत. सुदैवाने या सीटवर प्रवासी बसले नसल्याने जीवितहानी टळली. ट्रकचालकाने भरधाव वेगात जागा नसताना देखील ओव्हरटेक केल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

सोशल मीडियावर अफवा : अपघातानंतरसोशल मीडियावर एसटी ट्रकचे फाेटो व्हायरल झाले. तसेच १५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची अफवा पसरवण्यात अाली. त्यामुळे यावल, भुसावळ येथील नागरिकांनी जळगावातील बसस्थानक, पोलिस ठाण्यात फोन करून माहिती जाणून घेतली, त्या वेळी त्यांना ही अफवा असल्याचे कळाले.

दोन्हीवाहनांचे नुकसान : अपघातट्रकची केबिन पूर्णपणे चक्काचूर झाली, तर एसटीची अवस्था त्या पेक्षाही वाईट झाली. 

या अपघातामुळे दोन्ही वाहने रस्त्याच्या मधोमध बंद पडली. त्यामुळे दोन्ही बाजूने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना रस्ताच शिल्लक राहिला नाही. स्थानिक नागरिक वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. सुरुवातीला जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यात आले. त्यानंतर क्रेनच्या मदतीने एसटी बस ट्रकला रस्त्याच्या कडेला सरकवण्यात आले. या सर्व प्रक्रियेला सुमारे दीड तास वेळ लागला. त्यामुळे पूर्णवेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. दुचाकी, चारचाकी वाहने पर्यायी रस्त्यांची निवड करून मार्गस्थ झाली. मात्र, ट्रक, कंटेनर सारख्या मोठ्या वाहनांची रांग लागली होती. सकाळी १० वाजेनंतर वाहतूक सुरळीत झाली. 
ट्रक-एसटी अपघातात एसटीची केबिन पूर्णपणे कापली गेली. हे पाहण्यासाठी महामार्गावर नागरिकांनी केलेली गर्दी. 
 
बातम्या आणखी आहेत...