आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी अपघात; तरुण ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महामार्गावर पडलेली मृत नितीन अामाेदकर यांची दुचाकी. - Divya Marathi
महामार्गावर पडलेली मृत नितीन अामाेदकर यांची दुचाकी.
जळगाव - ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी तरसोद फाट्याजवळ घडली. गाडीवर मागे बसलेला दुसरा तरुण जखमी झाला असून अपघातानंतर गर्दीचा फायदा घेत ट्रॅक्टरचालक पसार झाला आहे. शनिवारी दुपारी कास्ट्राइबचे सल्लागार भाऊराव अभिमन्यू सपकाळे यांचा एसटी बसच्या धडकेत मृत्यू झाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आणखी एका तरुणाचा बळी गेल्यामुळे बेदरकार वाहनचालकांबद्दल संताप व्यक्त होत आहे. 
 
नशिराबाद येथे राहणारे नितीन एकनाथ आमोदकर (वय ३२) प्रमोद प्रल्हाद माळी (वय ४२) या दोघांना ट्रॅक्टरने धडक दिली. यात नितीनचा मृत्यू झाला आहे. नितीन प्रमोद हे दोघे एमआयडीसीतील एका पाइपच्या कंपनीत काम करीत होते. रविवारी दुपारी वाजता ते एमआयडीसीतून घरी जाण्यासाठी दुचाकीने (एमएच- १९, टी- २९३९) निघाले होते. नितीन हा दुचाकी चालवत होता. १.१५ वाजता तरसाेद फाट्याजवळ पोहचल्यानंतर समोरून येणाऱ्या एका ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे गाडी आणि मागे बसलेले प्रमोद माळी हे रस्त्याच्या कडेला फेकले गेले. तर नितीन ट्रॅक्टरच्या चाकाखाली आला. नितीनच्या डोक्यावरूनच ट्रॅक्टरचे चाक गेल्यामुळे तो जागीच गतप्राण झाला होता. या अपघातानंतर ट्रॅक्टरचालक थांबता पसार झाला.
 
परिसरातील नागरिक, वाहनचालकांनी दोघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी नितीन याला मृत घोषित केले. तर प्रमोद यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर नशिराबाद येथील शेकडो नागरिकांसह राजकीय पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घटनास्थळ तसेच रुग्णालयात धाव घेतली होती. सायंकाळी शवविच्छेदन करून नितीनचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण नशिराबाद गावावर शोककळा पसरली होती. 
 
घरातला कर्ता मुलगा गेला 
नितीन हा घरातील कर्ता मुलगा होता. सामान्य परिस्थिती असलेले आमोदकर कुटुंबीयांचा तो आधार होता. वडील एकनाथ आमोदकर हे देखील मोलमजुरी करतात. नितीनच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे, तर लहान भाऊ देखील मजुरीचे काम करतो. नितीन हा घरातील थोरला मुलगा होता. एमआयडीसीत कंपनीतकाम करून तो कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहात मोलाची भूमिका पार पाडत होता. त्यांच्या मृत्यूमुळे आमोदकर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. रुग्णालयात आलेल्या कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला. 
 
उशिराने सुरू झाले उपचार 
प्रमोद माळी यांना अपघातात जबर दुखापत झाली आहे. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सात क्रमांकाच्या वॉर्डात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दुखापतीमुळे विव्हळत असलेल्या माळी यांच्यावर सुरुवातीच्या २० मिनिटांपर्यंत उपचारच करण्यात आले नाहीत. त्यानंतर गावातील काही तरुणांनी संताप व्यक्त केल्यामुळे उपचार सुरू करण्यात आले. 
 
ट्रॅक्टरचालकाचा शोध सुरू 
नितीनच्या दुचाकीला ट्रॅक्टरनेच धडक दिली असल्याचे काही लोकांनी पाहिले. धडक दिल्यानंतर चालक ट्रॅक्टरसह पसार झाला. अपघाताची तीव्रता पाहता नागरिकांनी दुचाकीस्वारांना मदत करण्यास धाव घेतली. लोक मदतकार्य करण्यात गुंतले असल्याचा फायदा घेत ट्रॅक्टरचालक थांबताच पसार झाला. काही वेळानंतर नशिराबादच्या तरुणांनी ट्रॅक्टरचालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जळगावातील काही लोकांना फोन करून घटनेची माहिती देत कालिंकामाता चौफुलीजवळ थांबून संशयित ट्रॅक्टरचा तपास घेण्याचे सांगितले होते. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि दुचाकीवरून पटली ओळख; महामार्गावर सांडले रक्त... 
बातम्या आणखी आहेत...