आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्न लावून परत येताना तिघांचा अपघातात मृत्यू, जामनेर-बोदवड रस्त्यावरील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामनेर - येथील बोदवड रोडवरील वाडी किल्ला गावाजवळ दोन मोटारसायकलींची गुरुवारी समोरासमोर जाेरदार धडक झाली. यात दोघांचा जागीच तर एकाचा जळगावला उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. मृतात जामनेर टाकळीच्या दोघांसह बोदवड तालुक्यातील कोल्हाडीतील एकाचा समावेश आहे. अपघात इतका भीषण होता की दोन्ही मोटारसायकलींचे प्रचंड नुकसान झाले. 
 
अर्जुन रामदास माळी, प्रल्हाद श्यामराव माळी मंजुळाबाई प्रल्हाद माळी हे तिघे मध्य प्रदेशातील बहादरपूर येथे लग्नास गेलेले होते. लग्न लावून ते तिघे टाकळी या आपल्या गावी जाण्यासाठी एकाच मोटारसायकलवर जामनेरकडे येत होते. तर याचवेळी जगदेव वासुदेव किटे किसन चिमा शिंदे हे दोघेजण जामनेरजवळील मेंढपाळ वस्तीवर लग्न असल्याने तेथे भेट घेऊन कोल्हाडीकडे मोटारसायकलीने निघाले होते. जामनेर जवळील भवानी घाट चढून वाडीकिल्ल्याकडे जात असताना दोघा मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाली. यात अर्जुन माळी किसन शिंदे हे दोन्ही चालक जागीच ठार झाले. तर प्रल्हाद माळी यांना जळगावला उपचारासाठी नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. मंजुळा माळी जगदेव किटे यांनाही उपचारासाठी जळगावला हलवलेे. 

घरच्यांचा विराेध झुगारून लग्नास 
जगदेववासुदेव किटे हे बोदवड तालुक्यातील कोल्हाडी या गावचे मूळ रहिवासी आहेत. तर किसन चिमा शिंदे हे नाशिक जिल्ह्यातील नांदगावचे आहेत. किसन शिंदे हे आपल्या मेंढ्या घेऊन चार महिन्यांसाठी जामनेर बोदवड तालुक्यात वस्त्या करून राहतात. गुरुवारी किटे यांच्या भावबंदकीत कोल्हाडी येथे तर जामनेरजवळील शेतातील धनगर वस्तीत शुक्रवारी लग्न होते. त्यामुळे आधी घरचे लग्न लावा उद्याच्या लग्नासाठी जामनेरला जा, असा आग्रह कुटुंबातील काहींनी किटे यांना केला. मात्र, किटे यांनी आज जामनेर जवळील वस्तीवर फक्त भेट देऊन येतो. असे सांगून घरच्यांचा विराेध झुगारत किटे जामनेरला आले होते. परत जात असताना अपघात झाला आणि शिंदे जागीच ठार झाले तर किटे यांची परिस्थिती चिंताजनक आहे. 

खिशात दारूच्या बाटल्या 
अपघात झाल्याची माहिती मिळताच जामनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नजीर शेख, पोलिस उपनिरीक्षक विशाल पाटील यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळाकडे धाव घेतली. या वेळी जगदेव किटे किसन शिंदे हे दोघेही मद्यधुंद अवस्थेत अाढळले. त्यांच्या खिशात दारूच्या बाटल्या असल्याचेही दिसून आले. नशेत असल्यामुळेच हा अपघात झाल्याचे या वेळी नागरिकांमधून बोलले जात होते. शासकीय रुग्णवाहिका १०८ भाजपची रुग्णवाहिका घेऊन चालक जालम राजपूत सामाजिक कार्यकर्ते रवींद्र झाल्टे यांनी रुग्णवाहिकेतून जखमींना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणले. प्रथमोपचार करून रुग्णांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. तर जागेवर मृत्यू झालेल्या दोघांचे मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणले. अपघाताबाबत माहिती मिळताच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रुग्णालयात जाऊन आप्तेष्टांची भेट घेतली. 

 
बातम्या आणखी आहेत...