आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोज्वळ, बंडखोर, धाडसी ‘राधिका’ महिलांना भावते- अभिनेत्री अनिता केळकर हिचा ‘दिव्य मराठी’शी दिलखुलास संवाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राधिका सोशीक आहे. अनेकदा ती बंडखोरही होते; पण तिच्यातील सोज्वळपणाचा गोडवा आणि तिची धाडसीवृत्ती महिलांना चांगलीच भावते. तिच्या पात्रात अनेक महिला स्वत:ला पाहतात. त्यातच आपले सुख शोधतात आणि समाधानी राहतात, असे मत ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील ‘राधिका’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनिता केळकर हिने व्यक्त केले.
 
आपल्या अभिनयाने घराघरात पोहोचलेली ‘राधिका’ म्हणजे अनिता ही उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यक्रमाप्रसंगी सोमवारी आली होती. या वेळी तिने ‘दिव्य मराठी’शी खास बातचीत केली. 
 
अनिताचा जन्म जळगावचा अाहे. ती जळगावातील दीपक घाणेकर यांची भाची अाहे. ती लहानपणापासून दरवर्षी जळगावात यायची. या वेळी शहरातील गणेशोत्सवाला लावलेली हजेरी अाणि भरीत बाेरं यांची चव विविध जुन्या प्रसंग याविषयी आठवणींना तिने उजाळाही दिला. 
 
पत्रातून महिला होतात व्यक्त 
कार्यक्रमानंतर अनेक महिला येऊन भेटतात. पत्र पाठवतात अाणि अापल्या भावना व्यक्त करतात. एक महिला म्हणाली, मालिकेत राधिकाला जशी रेवती मैत्रीण, शेजारी मिळाले तसेच मला मिळाले असते, तर अाज माझी परिस्थिती वेगळी असती पण मी तुला पाहूनच समाधानी असून पुढच्या जन्मी तरी मला असे लाेक भेटू दे सांगत तुला बघताना मला बरे वाटते.
 
तर एक ज्येष्ठ महिला येऊन भेटल्या खूप रडल्या अाणि म्हणाल्या माझीही परीस्थिती मालिकेप्रमाणेच अाहे. पण मला नवऱ्याला नाही साेडायचे. १२ वर्षे झाले मी सहन करतेय. मात्र, मी तू जे करतेय ते पाहूनच समाधानी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
 
महिलांनी स्वयंपूर्ण व्हावे
प्रत्येक महिलेने स्वयंपूर्ण व्हावे. तिला तिच्या मैत्रिणींचा गोतावळा हवा. शिक्षण कमी असेल तरी चालेल, पण अापल्यातील गुण शाेधून त्याला पुढे न्यायला हवे. त्या माध्यमातून घराला कसा हातभार लागेल हे पाहावे. लग्न करताहेत; पण संवाद होत नाही, असे व्हायला नकाे. जोडीदाराशी संवाद साधणे खूपच महत्त्वाचे अाहे. एकमेकांच्या चुकांपेक्षा गुण अवगुणांसह एकमेकांना स्वीकारण्याची भावना हवी. 
 
अनेक भाषांचा मिळून महाराष्ट्र 
वऱ्हाडीबाेलीभाषा अजूनही मुंबई, पुणे येथे अनेकांना माहिती नाही किंवा माहिती आहे तरी बाेलली जात नाही. प्रत्येक भागातील भाषेचा लहेजा वेगळा असून मराठी भाषेेचे बाेलीभाषा हे पैलू अाहेत. प्रत्येक भाषेने अापले वेगळेपण जपले अाहे. त्यामुळे प्रत्येक भाषेचा अादर करावा, कारण बाेलीभाषा मिळूनच महाराष्ट्र तयार हाेताे; आणि या बोली भाषाही मराठीचे अंग अाहे.  
बातम्या आणखी आहेत...