आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय महामार्गांवर दीड लाख नागरिकांचा दरराेज जीव मुठीत घेऊन प्रवास; प्रशासन यंत्रणा ढिम्मच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - एकीकडे चाैपदरीकरण झाले. मात्र वेगावर नियंत्रण ठेवणारी काेणतीही यंत्रणा तयार केलेली नाही. त्यामुळे अपघात वाढताहेत. तर जळगावकडील मार्गावर चाैपदरीकरण नसल्यामुळे अपघात वाढले अाहेत. अाठवडाभरात दाेन माेठ्या अपघातांनी महामार्गावर नागरिक सुरक्षित नाहीत, हेच दाखवून दिले. दिवसभरात या तिघा महामार्गांवर २० हजार वाहने धावतात. त्यात अवजड वाहने साेडली तर बहुतांशी प्रवासी वाहने असतात. या वाहनांमधील दीड लाख नागरिकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागताे. यात एसटी मंडळाच्या प्रवाशांचाही सहभाग अाहेच.
 
शहराचा विकास हा महामार्गांवर अवलंबून असतो. धुळे शहराला लागून दोन महामार्ग एक राज्यमार्ग असूनही त्या तुलनेत फारसा विकास झालेला नाही; परंतु दळणवळणाचे मुख्य साधन असलेली हजारो अवजड वाहने दरराेज शहराजवळून ये-जा करतात. एकट्या मुंबई-आग्रा महामार्गावर दिवसभरात सुमारे साडेआठ हजार ट्रक, मिनीट्रक आदी वाहने जातात. याशिवाय सुमारे ५०० कार तत्सम चारचाकी वाहने जातात. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांचे प्रमाणही सुमारे ३००च्या आसपास आहे. मध्य प्रदेशची सीमा लागून असलेले हाडाखेड ते धुळे तालुक्यातील पुरमेपाडा शिवाराच्या हद्दीपर्यंत ही आकडेवारी ग्राह्य धरली जाते. तर याच शहराला लागून असलेल्या सुरत-नागपूर महामार्ग चाैपदरीकरणाचे काम मात्र अजूनही सुरू झालेले नाही. त्यामुळे अपघाताचे प्रमाण
 
वर्षभरात ३३० अपघातांमध्ये १०७ जणांनी गमावले प्राण 
शहर जिल्ह्यातून जाणारा मुंबई-अाग्रा महामार्ग अाणि सुरत-नागपूर महामार्गावर माेठ्या प्रमाणावर वाहतूक असते. देशातील विविध भागातील ट्रक अाणि इतर वाहनांकडून या महामार्गाचा वापर केला जाताेे. त्यापैकी मुंबई-अाग्रा महामार्गाचे चाैपदरीकरण झाले अाहे. त्यामुळे या महामार्गावर हाेणाऱ्या अपघाताची संख्या कमी झाली अाहे. दुसरीकडे नागपूर-सुरत महामार्गाचे अद्याप चाैपदरीकरण झालेले नाही.
 
हा रस्ता सिंगल राेड अाहे. त्यावर चारचाकी, दुचाकी वाहनांची दिवसभर ये-जा सुरू असते. या महामार्गालगत तालुक्यातील काही माेठी गावे अाहेत. त्या गावातील नागरिक अापल्या दैनंदिन कामासाठी शहरात येतात. त्यासाठी दुचाकीचा वापर प्रामुख्याने हाेताे. एकूणच दिवसभर या वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यात पाेलिसांकडील माहितीनुसार नाेव्हेंबर महिनाअखेर जिल्हाभरात ३३० अपघातात १०७ जणांचा मृत्यू झालेला अाहे. तर अनेकांना कायमचे अपंगत्व अाले अाहे. महामार्गावर दरराेज एखाद-दुसरा अपघात हाेत असताे. लहानमाेठ्या प्रमाणावर अपघाताची मालिका या ठिकाणी सुरूच असते. वर्षभरात फागणे येथे खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाला अपघात हाेऊन एकाच वेळी १७ जणांना अापला जीव गमवावा लागला हाेता. तसेच सुरत-नागपूर महामार्गावरील अनेक माेऱ्या, नाल्यांवर छाेटे पूल अाहेत. रुंदीकरणाअभावी पुलावरून खाली पडूनही अपघात हाेत असतात. दर महिन्याला तारखेला पाेिलसांकडून अपघातातील मृतांच्या अाकडेवारीची नाेंद घेतली जात असते. त्यामुळे अपघात त्यातील मृत्यूची संख्या यापेक्षा अधिक हाेण्याची शक्यता अाहे. अपघात थांबवण्यासाठी अनेक उपाययाेजना करूनही याेग्य प्रबाेधनाअभावी अपघाताची संख्या कमी हाेण्याएेवजी वाढत अाहे. 
 
सगळ्याच बाबींची दिसून येते अपूर्णता 
महामार्ग पोलिस दलाचे धुळे शिरपूर या ठिकाणी दोन केंद्र आहेत. या दोन्ही ठिकाणी अनुक्रमे २८ कर्मचारी कार्यरत आहेत. धुळ्याच्या पथकाला सोनगीर ते बेंद्रेपाडा तसेच तरवाडेबारी ते कुसुंब्यापर्यंत लक्ष द्यावे लागते. अर्थात एका केंद्राकडे सुमारे ५० ते ६० किमीचा परिसर येतो. शिरपूर महामार्ग केंद्राचीही अशीच स्थिती आहे. याशिवाय अपघाताग्रस्त वाहन हलवण्यासाठी अद्यापही पोलिस प्रशासनाकडे क्रेन नाही. खासगी क्रेनची मदत घ्यावी लागते. लांब अंतरामुळे पोलिसांना अपघातस्थळी पोहाेचण्यासही विलंब होऊ शकतो. शिवाय अपघातग्रस्त वाहन हटवण्यास उशीर होतो. हेच चित्र आरटीओ कार्यालयाचेही आहे. पुरेसे मनुष्यबळ नाही. 
 
गॅस टँकरचा धोका 
सुरत, अहमदाबाद, राजकोट सारख्या गुजरातमधील अाैद्याेगिकदृष्ट्या विकसित शहरांसाठी रासायनिक द्रव्य, गॅस, अॅसिडची वाहतूक करणारे अवजड वाहने सुरत बायपासमार्गे जातात. मुंबई-पुणे अथवा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातून येणारी वाहने मुंबई-आग्रा महामार्गाने तर औरंगाबाद, सोलापूरकडून येणारी अशी धोकेदायक वाहने थेट धुळे-सोलापूर अर्थात चाळीसगावमार्गे शहराकडे येतात. याशिवाय नाशिक-सटाणा-पिंपळनेरकडून गुजरातकडे जाणारी वाहनेही अाहेत; परंतु त्यांची संख्या इतर दोन मार्गांच्या तुलनेत कमी आहे. रासायनिक द्रव्यांच्या वाहनांमुळे गावांना धोका संभवतो.
 
क्षमतेपेक्षा पाचपट वाहतूक 
सुरत-नागपूरमहामार्गाची निर्मिती झाली. तेव्हापेक्षा आता पाचपट अधिक वाहतूक हाेते. गेल्या काही वर्षांपासून महामार्ग चाैपदरीकरणाचा मुद्दा भूसंपादन इतर कारणामुळे प्रलंबित अाहेत. परिणामी चाैपदरीकरण अद्याप सुरू झालेले नाही. चाैपदरीकरण हाेणार असल्याने जुन्या महामार्गाच्या दुरुस्तीकडेही संबंधित विभागाचे दुर्लक्ष हाेत अाहे. महामार्गावर अनेक िठकाणी खड्डे पडले अाहेत. खड्डे वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात हाेत असल्याची माहिती पाेिलसांकडून देण्यात अाली. 
बातम्या आणखी आहेत...