आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष, १२ सहकारी संस्था अवसायकांच्या प्रतीक्षेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- शहरासह तालुक्यातील एकूण १७ सहकारी संस्थांवर अवसायकांची नियुक्ती झाली अाहे. प्रत्यक्षात १७पैकी केवळ पाच संस्थांवरच अवसायकांनी पदभार स्वीकारला अाहे. उर्वरित १२ संस्थांवर अवसायकांची नियुक्ती केवळ कागदाेपत्री झालेली आहे. त्यामुळे ठेवीदारांची चिंता वाढली आहे.

पाेलिस बंदाेबस्तात सहकारी संस्थांचा पदभार स्वीकारण्याची तयारी सहकार विभागाने सुरू केली अाहे. शहरासह ग्रामीण भागातील काही सहकारी संस्था डबघाईला अाल्या अाहेत. त्यामुळे मुदतीनंतरही ठेवीदारांना त्यांच्या हक्काच्या ठेवी परत मिळवण्यात अडचणी येत आहेत. सहकार विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही ठेवी परत मिळत नसल्याने, ठेवीदार वैतागले आहे. त्यामुळे अनेकदा आंदोलनेदेखील करण्यात आली आहे. सहकार विभागाच्या उदासीनतेसोबत अनेक पतसंस्थांची कार्यालये बंद असल्याने ठेवीदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. संबंधित संस्थांचे चेअरमन, व्हाइस चेअरमन, मॅनेजर संचालकांनी पतसंस्थांना टाळे ठाेकले अाहे. त्यामुळे ठेवी परत मिळवण्यासाठी ठेवीदारांना दाद मागावी तरी कोणाकडे? असा प्रश्न आहे. सहकार विभागाकडे तक्रार करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने ठेवीदार हतबल झाले आहेत.
अतिरिक्त पदभार

भुसावळयेथील सहायक निबंधक कार्यालयात सहायक निबंधकांचे पद रिक्त असल्याने मुक्ताईनगर येथील सहायक निबंधकांकडे अतिरिक्त पदभार अाहे. भुसावळ कार्यालयात पूर्ण वेळ अधिकारी नसल्याने कामकाजावर परिणाम झाला आहे. शुक्रवारी कार्यालयात फक्त दाेनच कर्मचारी हजर हाेते.

- ठेवीदारांची अडचणसुटेना : सहकारविभागाच्या कार्यालयात ठेवीदारांची अडचण समजून घेण्यासाठी अधिकारी उपस्थित राहत नसल्याने नाराजी व्यक्त होते. याला आळा घालण्यासाठी सहकार विभागाने १७ सहकारी संस्थांवर अवसायकांची नियुक्ती केली आहे.

- स्वीकारला पदभार: सुनसगावतेलबिया उत्पादक संस्थेवर आर.आर.पाटील यांनी, तर साकरीत किसान, मॅकोस्पीन सुपेरियर, महाराष्ट्र सूतगिरणी कर्मचारी संस्था, मांडवेदिगर विकासो या संस्थांवर बँक अधिकारी (वरणगाव) यांनी पदभार घेतला.

सहकारमंत्र्यांचा आदेश : जिल्ह्यातील६० वर्षांवरील वयोवृद्ध ठेवीदारांची माहिती काढली जात आहे. अशा ठेवीदारांना ५० हजार रुपयांपर्यंतच्या ठेवी परत कराव्या, असे आदेश सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपनिबंधक संजय राऊत यांना दिले. त्यामुळे शुक्रवारपासून जिल्ह्यातील सर्वच सहायक निबंधकांना सूचना देण्यात आल्या.

याबाबत चौकशी केली जाईल
नियुक्तीनंतरहीसहकारी संस्थांवर अवसायकांनी पदभार का स्वीकारला नाही? याची चाैकशी केली जाईल. सहकारमंत्र्यांच्या अादेशानुसार वयोवृद्ध ठेवीदारांच्या याद्या तयार केल्या जात अाहेत. संजय राऊत, जिल्हाउपनिबंधक, जळगाव
पुढील स्लाइड्सवर पाहा, या संस्थांवर अवसायकांनी घेतला नाही पदभार