आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलनाचा प्रस्ताव हिवरा अाश्रमाकडून मागे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिवरा अाश्रम-  अंनिसच्या विराेधामुळे वादात अडकलेले ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हिवरा अाश्रमात (जि. बुलडाणा) घेणार नसल्याचे अायाेजक विवेकानंद अाश्रमाच्या वतीने कळवण्यात अाले. ‘संमेलन हे कायम संस्थानिकांचेच बटीक असावे, असे ज्या अदृश्य शक्तींना वाटते, त्या शक्तींनीच विवेकानंद आश्रम शुकदास महाराज यांच्या बदनामीची मोहीम उघडली हाेती. या पार्श्वभूमीवर संमेलन आयोजनाचा हेतू साध्यच होणार नाही, त्यामुळे संमेलन घेण्याबाबतचा प्रस्ताव अाम्ही मागे घेत अाहाेत,’ अशी माहिती आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. तथा रतनलाल मालपाणी यांनी दिली. 
बातम्या आणखी आहेत...