आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगसंगतीचा मेळ साधत रांगोळी रेखाटण्याचे महिलांनी घेतले धडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मधुरिमा क्लबतर्फे लायनेस क्लब हॉल येथे महिलांना रांगोळीचे प्रशिक्षण देताना भूषण वर्ळीकर. - Divya Marathi
मधुरिमा क्लबतर्फे लायनेस क्लब हॉल येथे महिलांना रांगोळीचे प्रशिक्षण देताना भूषण वर्ळीकर.
जळगाव- रंगसंगतीचा मेळ साधत एकाच पद्धतीच्या रांगोळ्यांपेक्षा चित्रांप्रमाणे त्या रेखाटण्याचे धडे मधुरिमा क्लबच्या सदस्यांना दुसऱ्या दिवशी देण्यात आले. तर दुसऱ्या सत्रात योगावर मार्गदर्शन करण्यात आले. 
 
लायनेस हाॅल येथे ‘दिव्य मराठी’च्या मधुरिमा क्लब लायनेस क्लबतर्फे अायाेजित मधुरिमा सदस्यांसाठीच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिरात शुक्रवारी रांगाेळी याेगाबाबत माहिती देण्यात अाली. रांगाेळी, मेंदी, पेंटिंगचे प्रशिक्षक भूषण वळींकर यांनी शीतरंग, उष्ण रंग संबंधित रंगसंगतीविषयी माहिती दिली.
 
या वेळी त्यांनी संस्कार भारती, पाच बाेटांचीच रांगाेळी व्यतिरिक्तही अनेक प्रकार असल्याचे सांगितले. यात टेक्चर, गालिचामधील प्रकार, साइडपट्यांद्वारे करता येणारी सजावट, वेगवेगळ्या पिसाऱ्यांच्या अाकारांनी माेर कसा साकारायचा यासह साध्या डिझाइनद्वारे अाकर्षक रांगाेळी कशी तयार हाेईल, गाेल चाैकाेनी पेक्षा वेगळे काही काढता येईल का? याची माहिती दिली.
 
तसेच माॅडर्न अार्ट, निसर्गचित्रे, संकल्प चित्रे याची माहिती दिली. शुभ डिझाइनचा कसा वापर करायचा हे सांगितले. यासह मुठीने रांगाेळी काढण्याची पद्धत शिकवली. त्यासह फ्लाेराेसन रंगांना चाळणीद्वारे आकृत्या काढल्या जातात, परंतु यावेळी रंगांचा अाकर्षक पद्धतीने वापर करण्यावर त्यांनी भर दिला. त्यासह उठावदार रंगांमुळे कसे रांगाेळी खुलते हे देखील सांगितले. या प्रशिक्षणाला महिलांचा प्रतिसाद मिळाला. 
 
 
प्रशिक्षक सागर साळी यांनी याेगा बाबत सविस्तर माहिती दिली. याेगा म्हणजे फक्त अासन, प्राणायाम नाही तर मुद्रा, बंध, मंत्रजप, प्रार्थना, शुद्धिक्रिया हे सर्व मिळून याेगा तयार हाेताे. यानुसार याेगा करणे गरजेचे अाहे. याेगा म्हणजे शरीर मनाचा विकास हाेय. यशस्वी जीवन जगायचे असेल तर योगसाधना करणे गरजेचे अाहे. नियमित याेगसाधनेमुळे रोगप्रतिकारक शक्तीत वाढ हाेऊन अाराेग्य संपन्नता येते. अापल्या शरिरात ७२ हजार सुक्ष्म नाड्या अाहेत.
 
या नाड्या शुद्ध करण्याचे काम याेग करते. तर शरीराला प्राणवायू देण्याचे काम प्राणायाम करत असते. त्याचप्रमाणे झाेपण्यापूर्वी झाेपण्याअाधी वेळा अाेंकार मंत्र जप करायला हवा, जाडपणा, संधीवातासाठी रात्री झाेपताना अापल्या अंथरुणाजवळ पाण्याचे भरलेला तांब्या ठेवायचा सकाळी उठल्यावर लगेच गुळणी करता ते पाणी प्यायचे. अन्न पचनासाठी हे महत्वाचे ठरते. तर पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन हे महिलांमध्ये खासकरून अाजार वाढत असून यावर तज्ञांद्वारे याेगाचे मार्गदर्शन घेतल्यास नक्कीच फायदेकारक ठरेल असेही त्यांनी सांगितले. 
 
बातम्या आणखी आहेत...