आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नैराश्य टाळण्यासाठी मन माेकळे करा; वाचन-लेखन नियमित करा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव - जागतिक अाराेग्य दिनानिमित्त जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘नैराश्य चला बोलू या’ या घोषवाक्यावर आधारित कार्यक्रम झाला. नैराश्य येण्यासाठी अापले मन जवळच्या व्यक्तींजवळ माेकळे करा, ध्यानधारणा करा, अध्यात्माचा अाधार घ्या, वाचन-लेखन करा, एखादी घटना अथवा प्रसगांबद्दल मानसिक तणाव अाणू नका, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात अाला. 
 
साद फाउंडेशन, विकास सेवा नेहरू युवा केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ओढरे गावात कार्यक्रम झाला. ज्येष्ठ रोटेरियन सदस्य रामभाऊ शिरूडे (वय ९५), वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रमोद सोनवणे, प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते.
 
नैराश्य आल्याने आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त होते, नैराश्य येण्यासाठी आयुष्यात सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाही ताणतणाव येऊ देता सुखी निरोगी आनंदी आयुष्य जगावे जेणेकरून एखादी घटना आपल्या मनाविरुद्ध घडली तरी उदास होता पुढे मार्गक्रमण करीत राहिले तर आयुष्यात नैराश्य कधीच येणार नाही, असे प्रतिपादन डाॅ. प्रमोद सोनवणे यांनी केले. डाॅ. प्रीती वर्मा यांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठीचे उपचार प्रतिबंधक उपाय सांगितले. 
 
विजेत्यांना बक्षीस वितरण 
या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. डाॅ. सोनवणे यांनी शालेय पोषण आहार वाटप किचनमधील स्वच्छता पाहणी केली असता चांगली स्वच्छता आढळून आली. या वेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आर. बी जाटिया, सरपंच रुख्माबाई निकम, भय्यासाहेब महाजन, सुनील राठोड, वैशाली निकम, कल्पतेश देशमुख, विकास राठोड, हेमंत तोंडे, यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते. 
 
शाैचालयाचा अाग्रह धरा 
प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनीने आई-वडिलांना घरीच शासनाचे शौचालय अनुदान घेऊन शौचालय बांधायला सांगावे अन्यथा आम्ही शाळेत जाणार नसल्याची प्रेमळ धमकी पालकांना देण्याबाबत सूचना केली. प्रत्येक कुटुंबाकडे स्वत:चे वैयक्तिक शाैचालय झाले तरच देश हागणदारीमुक्त हाेईल, असा संदेश देण्यात अाला.
बातम्या आणखी आहेत...