आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशयितांनी दाखवली मृतदेह जाळल्याची जागा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- रिधूर वाड्यातील प्रशांत अांबादास साेनवणे याचा खून करून त्याचा मृतदेह जाळल्याची जागा चारही संशयितांनी दाखवल्याची साक्ष तपासाधिकारी विवेक पानसरे यांनी बुधवारी दिली. या खटल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.बी.अग्रवाल यांच्या न्यायालयात साक्ष झाली.

तपासाधिकारी विवेक पानसरे यांची अॅड. गाेपाळ जळमकर यांनी सरतपासणी घेतली. यात त्यांनी सांगितले की, संशयित नरेंद्र सपकाळे, लक्ष्मी सपकाळे अाणि प्रदीप पाटील यांना ११ जुलै २०१२ राेजी अटक केली. त्यांनी मृतदेह जाळल्याची जागा दाखवली. तेथून अर्धवट जळालेले टायरचे, हाडांचे तुकडे जप्त केले. तसेच खदाणीत टाकलेला चाकू अाणि प्रशांतचा माेबाइल तसेच लेंडी नाल्यातून लाकडी दांडा काढून दिला. तसेच अनुसयाबाई काेळी हिनेसुद्धा मृतदेह जाळल्याची जागा दाखवली. तसेच पानसरे यांनी न्यायालयात हजर असलेले संशयित, गुन्ह्यात वापरलेले हत्यार अाेळखले. याप्रकरणी अॅड. प्रकाश बी. पाटील यांनी उलट तपासणी घेतली.
बातम्या आणखी आहेत...