आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंजली दमानियांचा न्यायालयात खडसेंविराेधात स्वत:च युक्तिवाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुक्ताईनगर - माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर आरोप केल्याप्रकरणी अंजली दमानिया, प्रीती मेनन यांच्याविरुद्ध भाजपचे विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश ढोले यांनी मुक्ताईनगर न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली. या वेळी दमानियांनी न्यायाधीश आर.एम. तुवर यांचेसमोर स्वत: युक्तिवाद करत पर्सनल बॉण्डचा अर्ज दिला होता. तो न्यायालयाने मंजूर केला.

मेनन यांच्या वकिलाने गैरहजेरीचा अर्ज दिला होता. पुढील कामकाज १९ नोव्हेंबरला होईल, अशी माहिती याचिकाकर्त्यांचे वकील संतोषकुमार टावरी यांनी दिली. दरम्यान, न्यायालयातून बाहेर पडल्यावर दमानिया म्हणाल्या, ‘दोन महिन्यांपूर्वीचा समन्सचा एक कागद मला मिळाला होता. या खटल्याबाबतची पूर्ण पीटिशनची प्रत मिळाली नव्हती. आपण माजी मंत्री खडसेंवरील आरोपांवर ठाम असून त्यांनी स्वत: खटला दाखल करायला पाहिजे होता.’
बातम्या आणखी आहेत...