आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावच्या पासपोर्ट कार्यालयास मंजुरी: विमानसेवाही लवकरच; खासदार पाटलांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारोळा -जळगाव येथे पासपोर्ट कार्यालयास मंजुरी मिळाली अाहेत. तसेच विमानसेवा देखील येत्या महिन्यात सुरु होणार असल्याची माहिती जळगाव लोकसभेचे खासदार ए. टी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. खासदार पाटील यांनी सांगितले, अधिवेशनात आपण तब्बल विधेयक मांडले. यात आर्थिक कमकुवत असलेल्या बीपीएलधारक नागरिकांच्या मुलामुलींचे लहानपणापासून शिक्षण सरकारने करावे. तसेच अनुकंपा तत्त्वावर नोकर भरती ९० दिवसाच्या आत करावी ती झाल्यास परिवारास आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मानधन दिले जावे, शैक्षणिक विषयात प्रथमपासून संस्कृत हा विषय सक्तीचा करावा, विधवा, सोडून दिलेल्या महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना त्यांची मुले वागवत नाही अश्या स्री, पुरुषांना सरकारकडून संरक्षण आर्थिक मदत दिली जावी अादी चार विधेयकांचा समावेश अाहे. पत्रकार परिषदेस भाजप तालुकाध्यक्ष अतुल मोरे, शहर अध्यक्ष मुकुंदा चौधरी, अमोल जाधव, विनोद पाटील, धीरज महाजन, विलास चौधरी उपस्थित होते. 
 
पासपोर्ट कार्यालय एअरलाइन कनेक्टिव्हिटीवर पाठपुरावा 
गेल्यादोन वर्षांपासून आपण पासपोर्ट कार्यालयासाठी पाठपुरावा केल्याने त्यास मंजुरी मिळाली अाहे. कार्यालय पोस्ट विभागातच सुरु होणार आहे. सध्यस्थितीत असलेल्या कार्यालयामध्ये जागा अपूर्ण पडणार असल्याने नवीन जागेबाबत रिजनल अधिकारी स्वाती कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पाहणी सुरु आहे. तसेच जळगाव येथे एअरलाइन्स कनेक्टीव्हिटीसाठी देखील आपण नागरी उड्डाण मंत्री विभागाकडे जळगावचा विषय लावून धरत तो समावेश करून घेतला. याबाबत जळगाव येथे एटीएस फ्लाइट येत्या महिन्यात सुरु होणार आहे. यात जळगाव- मुंबई, दिल्ली, पुणे यांचा प्रमुख समावेश आहे. 
 
सात दिवसीय दाैरा
२४ एप्रिलपासून एकूण लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचा यु.के. येथे पार्लमेंटरी दौरा अाहे. यात खासदार पाटील यांच्यासह लोकसभेचे तर राज्यसभेच्या सदस्यांचा समावेश अाहे. या दौऱ्यात लंडन येथे पार्लमेंट भेट जगातील गुलामगिरी विषयावर सेमिनार होईल. यात अन्याय, अत्याचार, गुलामगिरी विषयावर जगातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सात दिवसीय दौऱ्याबाबत दिल्ली येथे चर्चासत्र घेतले जात अाहे. 
 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...