आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावच्या कारागृह अधीक्षकांसह दाेघांना दोन हजारांची लाच घेतल्याप्रकरणी अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव -  न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी  दोन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या जळगाव कारागृह अधीक्षक आणि शिपायाला एसीबीने शुक्रवारी अटक केली. अधीक्षक  दिलीपसिंग तेजसिंग डाबेराव व शिपाई बापू नामदेव आमले अशी दोघांची नावे आहेत.
 
 आठ महिन्यांपूर्वी एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील संशयित आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान, प्रकृती खराब असल्याने अापल्याला रुग्णालयात दाखल करण्याची विनंती त्याने केली होती.  मात्र, त्यासाठी डाबेराव व अामले यांनी पाच हजारांची मागणी केली होती. यापैकी तीन हजार आधीच घेतले हाेते उर्वरित दोन हजार रुपये घेताना दोघांना अटक झाली.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...