आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात 31 व्या अस्मितादर्श संमेलनाचे डॉ. किरवलेंनी भूषवले अध्यक्षपद; दलित साहित्यावर मार्मिक विवेचन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्ह्यात २४ २५ नोव्हेंबर २०१२ रोजी झालेल्या ३१व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. कृष्णा किरवले यांनी भूषवले. विशेष म्हणजे या संमेलनात डॉ. गंगाधर पानतावणे डॉ. किरवले हे गुरू-शिष्य एकाच व्यासपीठावर होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी दलित साहित्य, मराठी आणि भारतीय भाषेतील साहित्य, सामाजिक सुरक्षा या विषयांवर अत्यंत मार्मिक विवेचन केले होते. 
 
जळगाव जिल्ह्याला अांबेडकरी दलित साहित्यिकांची, चळवळीची माेठी समृद्ध परंपरा लाभलेली अाहे. उत्तराेत्तर ही परंपरा वृध्दिंगत हाेत अाहे. अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून पद्मश्री नामदेव ढसाळ हे लाभले हाेते. तर स्वागताध्यक्ष अामदार शिरीष चाैधरी हे हाेते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डाॅ. सुधीर मेश्राम, अामदार जयदेव गायकवाड, संमेलनाचे संयाेजक डाॅ. मिलिंद बागुल यांची संमेलनाला उपस्थिती हाेती. या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे डाॅ. किरवले यांचे गुरू डाॅ. गंगाधर पानतावणे यांचीही विशेष उपस्थिती संमेलनाला हाेती. 
 
पानतावणे सरांकडून पीएच.डी. मिळवलेले पहिले विद्यार्थी डाॅ. किरवले हे हाेते. त्यांनी अध्यक्षीय भाषणात जळगाव जिल्ह्यातील अांबेडकरी चळवळीच्या चार पिढ्यांचा इतिहास मांडला. या साेबत सामाजिक असुरक्षितता अाणि विकृतीकरणावर अासूड अाेढले. खासगीकरण, उदारीकरण जागतिकरणाच्या चक्रव्यूहात संविधानाने संरक्षित केलेल्या मागासवर्गीय समाजाचे अारक्षण कवच धाेक्यात अाल्याचे मांडले. 
 
नागरी वस्त्यांलगत झाेपडपट्टीत राहणाऱ्या कामगार वर्गाच्या मूलभूत समस्यांची साेडवणूक झाल्याचे अधाेरेखीत केले. त्यासाेबत भाषावार प्रांतरचनेतून निर्माण झालेल्या समस्यांची उकल, बेराेजगारांची प्रश्न, विमुक्त अाणि अादिवासींना मुख्य प्रवाहात अाणण्यात अालेल्या अपयशाचे वास्तव ठळकपणे मांडले हाेते. 
 
बातम्या आणखी आहेत...