आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहान मुलांना वाचवताना रिक्षाची दुचाकीला धडक; दोन जण जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुलाजवळ असलेल्या सिग्नलनजीक रविवारी सायंकाळी वाजता सायकलवरील लहान मुलांना वाचविण्याच्या प्रयत्नात रिक्षाचालकाने समाेरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीवरील दाेन्ही युवक जखमी झाले असून, रिक्षाचेही नुकसान झाले अाहे. 
 
रेल्वेस्थानकावर नातेवाइकांना साेडून शेख जावेद शेख करीम (वय ३५, रा. शिवाजीनगर) हा त्याच्या रिक्षाने (क्र. एमएच-१९/व्ही-३१५१) घराकडे जात हाेता. रविवारी सायंकाळी वाजता शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुलाजवळ असलेल्या सिग्नलजवळ काही लहान मुले वेड्यावाकड्या पद्धतीने सायकल चालवत हाेते. अचानक समाेर अालेल्या सायकलवरील मुलांना वाचविताना जावेद शेख याने रिक्षा वळविली.
 
त्या वेळी जिल्हा परिषदेकडून रेल्वेस्थानकाकडे सत्यराज गाेपाल गायकवाड (वय २१, रा. जिल्हापेठ), अंकुश पाटील हे दुचाकीने जात हाेते. रिक्षा अचानक वळल्याने गायकवाड याच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील दाेन्ही युवक लांब फेकले गेल्याने ते जखमी झाले. याप्रकरणी शहर पाेलिस ठाण्याचे नवजित चाैधरी, सुनील पाटील यांनी घटनास्थळावर जाऊन दाेघांना ताब्यात घेतले. मात्र, नुकसानभरपाई देणार असल्याने पोलिसात काेणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात अाला नाही. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...