आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदी असूनही शहरात दारू विक्रीला ऊत, सर्वाेच्च न्यायालयाच्या अादेशाची हाेतेय पायमल्ली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव- बंदी असताना शहरातील अनेक हॉटेलमध्ये सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करत दारूची अवैध विक्री होत अाहे. जास्तीचे पैसे घेऊन बारमालक सर्रासपणे दारू विक्री करत असून राज्य उत्पादन शुल्क पोलिस प्रशासन याकडे दुर्लक्ष करताय. 

चाळीसगाव शहर तालुक्यात जवळपास ७० बिअर बार, परमिटरूम, वाइन शॉप, देशीदारू दुकाने आहेत. राज्यमहामार्गापासून तब्बल ५०० मीटरपर्यंत कोणत्याही हॉटेलवर परमीटरूमवर कोणत्याही प्रकारची विक्री करता येणार नाही, असा आदेश सर्वाेच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार चाळीसगाव शहरातील तालुक्यातील परमीट रूम, बीअरबार, देशीदारू अन्य मद्यविक्री केंद्रांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने दुकाने बंद करण्याबाबत नोटीस दिल्या. परंतु शहरात राज्य उत्पादन शुल्काचे दारूबंदीचे विभागीय कार्यालय असूनही एक दिवसही दारूबंदी करण्यात आली नाही. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशान्वये शहरातील एकही परमिट रूम, बिअर बार, वाइनशॉप देशीदारूचे दुकान बचावले नाही. परंतु शहरातील स्टेशन रोड, भडगाव रोड घाटरोडवरील अनेक परमिटरूम हॉटेलवर सर्रासपणे जास्तीचे पैसे घेऊन दारू विक्री करण्यात येत असून दारूबंदी विभाग पोलिसांनी लक्ष द्यावे.    
 
जास्तीचे पैसे घेऊन विक्री 
शहरातील जवळपास ५० ते ८० टक्के हॉटेलवर चोरीचुपके दारू विक्री करण्यात येत आहे. दारूच्या प्रत्येक बाटलीमध्ये हॉटेल बारमालक जवळपास ५० ते ७० रुपये जास्तीचे घेऊन दारू विक्री करत आहेत. बंदी असूनही जास्तीचे पैसे घेऊन दारू मिळत असून याबाबत नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. 
 
अन्यथा कारवाई : साेनवणे 
याविषयी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक साेनवणे यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की, सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालानुसार शहरातील प्रत्येक दुकानात दारूबंदी करण्यात अाली अाहे. त्यांना दारू विक्रीची परवानगी नाही. तशी नाेटीसा त्यांना बजावण्यात अाली असून दारू बंदी असताना दारू विक्री करताना काेणी अाढळला तर सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येईल. न्यायालयाचा अादेश असल्याने या अादेशाचे पालन प्रत्येक दुकानदाराने करावे. 
 
सामान्यांकडून स्वागतच 
सर्वाेच्चन्यायालयाच्या या निर्णयाचे सामान्य जनतेने मात्र स्वागत केले असून जे शासन करू शकले नाही ते एका याचिकाकर्त्याच्या तक्रारीवरून न्यायालयाने करून दाखविले. 
 
स्पेशल माणसांकडून होतेय दारूची लपून विक्री 
शहरातील अनेक परमिटरूममध्ये दारू विक्री करण्यात येत अाहे. ग्राहक दारू घेण्यासाठी गेला असता हॉटेलमालक परमिट रूममालक बाजूला उभे असतात. तसेच हॉटेलच्या बाजूला उभ्या असलेल्या स्पेशल माणसांकडे बोट दाखवून दारू विक्री करण्यात येत आहे. दारूचा साठा हॉटेलमध्ये ठेवता हॉटेलच्या मागे, दुचाकी, चारचाकीतील डिकीत ठेवण्यात येत असताे. हॉटेलमध्ये बसू देता ग्राहकांना पार्सल स्वरूपात दारू देण्यात येते. त्यामुळे नागरिक संतप्त झाले अाहेत. या निर्णयामुळे अपघात कमी हाेऊ शकेल. 
 
बातम्या आणखी आहेत...