आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बँकांसमोरील निम्मे गर्दी ओसरली; मनपा तिजोरीत दीड कोटी जमा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - पाचशे एक हजार रुपयांच्या नाेटा मध्यरात्रीपर्यंतच स्वीकारल्या जातील. तशी मुदतच देण्यात अाल्याचे जाहीर झाल्यानंतर सकाळपासून महापालिका तसेच वीज मंडळाच्या कार्यालयांसमाेर काही प्रमाणात गर्दी दिसून अाली. मात्र पंधरा दिवसांत बँकांसमाेरील गर्दी मात्र अाेसरल्याचे दिसून अाले. विशेषत: एसबीआय बँक अॅक्सिस बंॅकेत हे चित्र दिसून आले. तर दुसरीकडे बँक इतर शासकीय कार्यालयांमध्ये पाचशे एक हजार रुपयांची नोट पुढे केली जात होती. शहरातील काही पेट्रोल पंप चालकांनी तर शासन निर्णय असूनही नोटा स्वीकारण्यास असहमती दर्शविली.
शहरात गुरुवारी नोटा स्वीकारण्याचा शेवटचा दिवस होता; परंतु शहरातील विविध बँकांमध्ये मात्र त्या तुलनेत नागरिकांची अधिक गर्दी जाणवली नाही. बहुधा सुरुवातीपासून नागरिकांनी भीतीपोटी नोटा बदलल्यामुळे अथवा शासनाने बोटावर शाई लावण्याचा पर्याय पुढे केल्यामुळे हे चित्र निर्माण झाल्याचे बोलले जात होते. त्यामुळे गेल्या १४ दिवसांमध्ये बँकांबाहेर असलेली गर्दी काहीशी कमी जाणवत होती. तथापि मुख्य पोस्ट कार्यालयात मात्र नोटा बदलण्यासाठी नेहमीप्रमाणे गर्दी दिसून येत होती. त्यामुळे बंॅकेतील खातेदारांपेक्षा पोस्टातील खातेदारांकडे ५००, १०००च्या नोटा शिल्लक राहिल्या कशा असा प्रश्नही उपस्थित केला जात होता. सायंकाळी उशिरापर्यंत बँक पोस्ट कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी कामात गुंतले होते. त्यामुळे गुरुवारीही बँक अधिकारी कर्मचाऱ्यांनी अधिक परिश्रम घेतले.

कर भरण्याची अशी स्थिती
मनपाच्या आवारात कर भरणा करण्यासाठी तीन कंेद्र सुरू करण्यात आले होते. यात दुपारी १२ पर्यंत साधारणपणे २५ ते ३० लाख रुपयांचा भरणा होता. चार वाजेनंतर ५० लाख सायंकाळी सात वाजता कोटी १८ लाख रुपये रात्री नऊ वाजेच्या सुमारास कोटी ५० लाख रुपयांचा कर भरणा झाला होता.

महापौरांनी केली पाहणी
महापालिकेत कर भरणा करण्यासाठी गुरुवारी शेवटची मुदत होती. नागरिक उशिरापर्यंत कर भरण्यासाठी येत असल्याचे दृश्य होते. या कर भरणा केंद्राची सायंकाळी वाजेच्या सुमारास महापौर कल्पना महाले यांनी मनपात फिरून पाहणी केली. तसेच कर भरण्याचा आढावा घेतला.
महापालिकेत रात्री उशिरापर्यंत कर्मचारी नोटा स्वीकारण्याचे काम करीत होते.

एटीएम सेवा विस्कळीत
नवीन नोटा व्यवहारात येऊनही अद्याप अनेक एटीएममध्ये आलेल्या नाही. शिवाय एटीएम सेंटर काही ठिकाणी पुन्हा बंद दिसून आले. नेटवर्क आणि लोड आल्याचे कारण त्यासाठी सांगितले जात होते. ग. नं. पाचमधील बँक ऑफ बडोदा आणि एसबीआयचे एटीएम सेंटर दुपारी सुमारे बारा वाजेपर्यंत बंद होते. तर याच गल्लीतील हस्ती बँकेच्या शेजारी असलेल्या एटीएम सेंटरवरून नागरिक क्रमाने येऊन पैसे काढत होते. मात्र पुरेशी रक्कम नसल्याचे आढळून आले.
मुदतीने तारांबळ | देणी चुकवण्यासाठी दिवसभरात हजार पाचशे रुपयांचा झाला भरणा
महापालिका प्रशासनाने चलनातील जुन्या पाचशे, हजार रुपयांच्या नोटा कर भरण्यात स्वीकारण्याचे जाहीर केल्यापासून मनपात दररोज नागरिक कर भरणा करीत हाेते. दि. १० नोव्हेंबरपासून हा कर भरणा सुरू हाेता. त्याची मुदत गुुरुवारी संपली. शेवटच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिक कर भरणा करीत हाेते. आतापर्यंत साडेचाैदा कोटी रुपयांवर हा कर भरणा झालेला आहे.

महापालिका प्रशासनाने मनपा कर भरण्यासाठी सुरुवातीला चार ते पाच काउंटरची व्यवस्था केली हाेती. त्यानंतर दोन काउंटर सातत्याने सुरू ठेवण्यात आले. महिलांसाठी वेगळी रांग करण्यात आली हाेती. नागरिकांच्या महापालिकेत लांबच लांब रांगा लागल्या नाहीत, मात्र भरणा काउंटरवर कायम पंचवीस, तीस नागरिकांची रांग असल्याचे या दिवसांतील दृश्य हाेते. दिवसाला ४० लाखांवर भरणा मनपाच्या तिजोरीत जमा होत हाेता. जुन्या पाचशे, हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्याने नागरिकांनी भरणा मोठ्या प्रमाणात केला.
बातम्या आणखी आहेत...