आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे, नंदुरबार ग.स.ब‌ॅंकेचे संचालक मंडळ सहा महिन्यांसाठी बरखास्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - धुळे नंदुरबार जिल्हा सहकारी नाेकरांची बॅंकेचे (ग.स.) संचालक मंडळ सोमवारी सहा महिन्यांसाठी बरखास्त करण्यात अाले. बॅंकेत प्रशासक म्हणून उपनिबंधक जे.के.ठाकूर यांची नियुक्ती करण्यात अाली. त्यांनी दुपारी पदभारही घेतला. अनियमितता, अनाठायी खर्च, बोगस कर्जप्रकरणांमुळे संचालक मंडळ बरखास्तीची कारवाई रिझर्व्ह बँकेच्या अादेशानुसार झाली. बॅंकेचे कार्यक्षेत्र पाच जिल्ह्यांचे अाहे.
 
शहरातील गरुड बागेमध्ये मुख्य कार्यालय असलेल्या धुळे नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांच्या सहकारी बँकेत सोमवारी सकाळी सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. कार्यालयीन कामे सुरू असतानाच बँकेवर संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक बसविल्याची माहिती पुढे आली. यानंतर दुपारी एक वाजेच्या सुमारास उपनिबंधक जयसिंग ठाकूर यांनी प्रशासक म्हणून बँकेचे कामकाज हाती घेतले याच वेळी दप्तर तपासणी सुरू केली. रिझर्व्ह बॅंकेकडे करण्यात आलेली तक्रार आणि रिझर्व्ह बंॅकेच्या धाेरणानुसार ही कारवाई झाली आहे. कारवाईत बँकेचे संचालक मंडळ सहा महिन्यांसाठी निलंबित केले आहे. यादरम्यान त्यांनी मंजूर केलेली कर्जप्रकरणेदेखील रद्दबातल ठरविली जाणार आहेत, तर प्रशासक म्हणून व्यवहार पाहणारे उपनिबंधक ठाकूर यांनी स्वाक्षरी केलेल्या प्रकरणांवरूनच नवीन कर्जप्रकरणही मंजूर केले जाणार आहे. थोडक्यात, विद्यमान संचालकांचे पुढील सहा महिन्यांपर्यंत सर्व अधिकार काढून घेण्यात आले आहेत. तथापि, रिझर्व्ह बँकेने कारवाईत काढलेल्या त्रुटींची पूर्तता केल्यास संचालक मंडळाकडे पुन्हा कारभार दिला जाऊ शकतो. दरम्यान, बँकेची स्थिती भक्कम आहे. अजूनही एकूण ३२० कोटींची गंगाजळी आहे. बॅंकेच्या निकषांनुसार गुंतवणुकीचा दर ७३ कोटींएेवजी ८३ कोटींपर्यंत आहे. शिवाय थकीत कर्जाचे प्रमाणही अत्यल्प आहे, असा दावा 
उर्वरित.पान १० 
 
८० वर्षांत दाेनदा प्रशासक 
धुळे सहनंदुरबार, जळगाव, नाशिक अहमदनगर जिल्ह्यातही बॅंकेचे सभासद आहेत. सद्य:स्थितीत सभासदांची संख्या २५ हजारांपर्यंत आहे. यापूर्वी बँकेवर सन २००२-२००३मध्ये प्रशासक बसविण्याची वेळ आली होती. त्या वेळी आर.एल.पाटील हे प्रशासक म्हणून बसले हाेते. यानंतर पुन्हा १४ वर्षांनी प्रशासक बसले. ८० वर्षांत बंॅकेवर दाेनदा प्रशासक बसले अाहे.
 
आदेशानुसार पालन 
- बॅंकेवर प्रशासक बसविण्याचे आदेश आयुक्त कार्यालयातून प्राप्त झाले होते. त्यानुसार जबाबदारी स्वीकारली आहे. सहा महिन्यांसाठी संचालक मंडळ निलंबित राहणार असले तरी, व्यवहार सुरळीत राहतील. ठेवी कर्जमंजुरीही या काळात होईल. संचालकांनी त्रुटींची पूर्तता केली तर पुन्हा संचालक मंडळ बँकेवर बसेल.
जयसिंग ठाकूर, प्रशासक, ग.स.बँक 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...