आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘भोंगऱ्या आया रे भाया... आया रे भाया...’, भाेंगऱ्या बाजार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धानोरा-  सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेली गावे, पाडे, वस्त्यांमध्ये मार्चपासून ढोल-ताशांवरील नृत्यात भोंगऱ्या सणास अपूर्व उत्साहात प्रारंभ होणार आहे. होलिकोत्सवाची सुरुवात माघ पौर्णिमेला दांडापूजनाने होते. आदिवासींच्या संस्कृतीत परंपरेने आलेल्या दांडापूजनाला विशेष महत्त्व आहे. 
 
पाडे, वस्त्यांमध्ये तरुण-तरुणींसह आबालवृद्ध ढोल-ताशांच्या तालावर बासरीच्या सुरांनी धुंद होऊन “भोंगऱ्या आया रे भाया... आमृ पिवा आवलू रे भाया....’ , ‘चालू चालू रे भोंगऱ्या देखने चालू...’ अशी लोकगीते सादर करून भोंगऱ्याचा मनमुराद आनंद लुटणार आहेत. १२ रोजी होळीच्या दिवशी समारोप होणार आहे. आदिवासी पावरा बांधवांचा सर्वात आवडता मन उत्साहित करणारा सण म्हणजे भोंगऱ्या होय. दिवाळीला जेवढे महत्त्व असते, तेवढेच आदिवासी बांधवांमध्ये भोंगऱ्या सणाला महत्त्व असते.
 
 हा सण उत्साहात साजरा करण्यासाठी पाडे-वस्त्यांमध्ये स्थानिक रहिवाशांसह बाहेरगावी राहत असलेले पावरा बांधव एकत्र येतात हा सण जल्लोषात साजरा करतात. यंदाही मोठ्या प्रमाणावर पावरा बांधव बिडगाव, कुंड्यापाणी, डुकर्णे, बलवाडी, वरला, शेवरेपाडा, बढाई, बडवानी, वरगव्हाण, धवली, सेंधवा अादी ठिकाणी एकत्र येऊन भोंगऱ्याचा आनंदोत्सव साजरा करणार आहेत. 
 
अंगावरील आभूषणांचे महिलांमध्ये आकर्षण 
महिलांकडे जेवढेही अलंकार असतील ते घालून नृत्य करतात. कमरेला चांदीचा करदोडा, बाहवा, बाजुबंद, वाकला, कडी, पिंजण्या असा महिलांचा पेहराव असतो, तर पुरुषांचा धोती, टोपी, कुडता, कोट, रंगीबेरंगी चष्मे असा पेहराव असताे. 
 
येथे भरणार भाेंगऱ्या--- 
6 ते 12 मार्चपर्यंत भाेंगऱ्या बाजार भरणार अाहे. राेजी अडावद, राेजी मेलाणे, किनगाव, वरगव्हाण, राेजी धवली, राेजी बलवाडी, धानोरा, 10 राेजी वरला, यावल, 11राेजी वैजापूर, पळासनेर, 12 राेजी कर्जाणे, कुंड्यापाणी, सेंधवा येथे समाराेप हाेईल. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...