आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेचे अधिकारी प्रभारी, कामे खाेळंबली- लाेकभावनांचा उद्रेक हाेण्याची चिन्हे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- पालिकेतील प्रमुख सहा अधिकारी प्रभारी अाहेत. मात्र, त्यापैकीही तीन जण रजेवर असल्याने प्रशासकीय कारभार वाऱ्यावर अाहेे. मूलभूत सेवा-सुविधांच्या संदर्भात तक्रार करावी कुणाकडे? असा प्रश्न उभा ठाकला अाहे. लक्षवेधी अशी कामेच हाेत नसल्याने सत्ताधाऱ्यांसह विराेधकांवरही जनतेचा राेष वाढला अाहे.

भुसावळ ही नाशिक विभागातील एकमेव वर्ग पालिका अाहे. परंतु, प्रभारीराज कायम असल्याने विकासकामे खाेळंबली अाहेत. मुख्याधिकारी बी. टी. बाविस्कर हे रजेवर अाहेत. त्यांचा पदभार सावद्याचे मुख्याधिकारी अमाेल बागुल यांच्याकडे साेपवण्यात अाला अाहे. नगरअभियंता विवेक भामरे लाचखाेरी प्रकरणात निलंबित झाले अाहेत. त्यांचा पदभार प्रशांत जाेंधळेंकडे अाहे. लेखापाल डी. एस. खरात हे दीर्घकालीन रजेवर अाहेत. येत्या दाेन दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रभारी लेखापाल नियुक्त हाेण्याचे संकेत अाहेत. कार्यालय अधीक्षकपदी अख्तर खान यांची प्रभारी नियुक्ती अाहे. करअधीक्षक प्रकाश काेळी हे प्रभारी असून ते महिनाभरापासून रजेवर अाहेत. अाराेग्य अधिकारी अशाेक फालक हे सात वर्षांपासून प्रभारी अाहेत. अग्निशमन विभाग, बिल्डिंग मेंटनन्स विभाग, अस्थापना विभाग, सामान्य प्रशासन विभागातही बहुतांश अधिकारीही प्रभारीच अाहेत. महत्त्वाची स्थायी, अस्थायीपदांची भरती हाेत नसल्याने कर्मचाऱ्यांचा अनुशेष वाढत अाहे. सध्या अास्थापनेवर ३०२ सफाई कर्मचारी अाहेत. मात्र, त्यांची भरतीही पूर्ण झालेली नाही.

उपमुख्याधिकारीही रजेवर
उपमुख्याधिकारीम्हणून अार. डी. साठे यांची नियुक्ती अाहे. मात्र, वर्षभरापासून ते पालिकेत नाहीत. दीर्घकालीन रजेवर असतानाही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कारवाई का हाेत नाही? असा प्रश्न उपस्थित हाेत अाहे. टेलिफाेन अाॅपरेटरचे पदही रिक्त अाहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची टेलिफाेन अाॅपरेटर म्हणून प्रभारी नियुक्ती करण्यात अाली अाहे. अनेक वेळा बिले भरलेली नसल्याने टेलिफाेन यंत्रणा बंद पडले. अशावेळी टेलिफाेन अाॅपरेटर या पदावरील कर्मचाऱ्यांना अन्य कामे करावी लागत असल्याची अाेरड वाढली अाहे.

पालिकेतील सत्ताधारीउदासीन अाहेत. कर्मचाऱ्यांवर नियमबाह्य कामे लादली जात असल्याने काेणीही प्रभारी कामकाज सांभाळण्यास तयार हाेत नाही. प्रभारी नियुक्ती मिळालेले अधिकारी, कर्मचारी गंभीर नाहीत. युवराज लाेणारी, उपनगराध्यक्ष,भुसावळ

अस्थायी, स्थायी पदे भरावी
स्थायी,अस्थायीस्वरुपाची राेस्टरवर असलेली पदे भरावी, याबाबत ठराव करून जिल्हाधिकारी, नगरविकास विभागाला पाठवला अाहे. कर्मचारी रजेचा प्रभारी जबाबदारीचा विषय जिल्हा प्रशासनाचा अाहे. अख्तर पिंजारी, नगराध्यक्ष,भुसावळ

ही कामे रखडली
शहरात विविध भागांत पथदिव्यांची दुरुस्ती, नालेसफाई, गटारींची साफसफाई, उद्यानांची देखभाल दुरुस्ती, जलवाहिनींची दुरुस्ती अशी विविध कामे रखडली अाहेत. मुख्याधिकारी रजेवरून कधी पालिकेत हजर हाेतात? याची नागरिकांसह पालिका पदाधिकाऱ्यांना प्रतीक्षा असल्याचे दिसून येत अाहे.

पालिका कार्यालय सुनेसुने
मुख्याधिकारीबाविस्कर हे रजेवर असूनही प्रभारी मुख्याधिकारी पालिकेत हजेरी लावत नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना रान माेकळे झाले अाहे. ‘अाअाे जाअाे घर तुम्हारा’ असे िचत्र पालिकेत शुक्रवारी फेरफटका मारला असता दिसून अाले. मूलभूत सेवासुविधा मिळण्यासाठी नागरिकांना पालिकेचे उंबरठे झिजवावे लागतात. मात्र, येथे तक्रारी स्वीकारण्यासाठी अधिकारी नसल्याने अनेकदा नाइलाज हाेताे.
बातम्या आणखी आहेत...